1 वरुन 31 रुग्णांपर्यंत मजल, मालेगावनंतर आता येवलाही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती

रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात येवल्यातील 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

1 वरुन 31 रुग्णांपर्यंत मजल, मालेगावनंतर आता येवलाही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती
Follow us
| Updated on: May 11, 2020 | 5:37 PM

नाशिक : नाशिक आणि मालेगावनंतर आता येवलाही कोरोना (Yewala Corona New Hotsopt) हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. रविवारी रात्री आलेल्या अहवालात येवल्यातील 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेपासून सुरु झालेली येवल्यातील कोरोना बधितांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. त्यामुळे मालेगाव, नाशिकनंतर आता येवलाही कोरोनाचा हॉटस्पॉटच्या (Yewala Corona New Hotsopt) मार्गावर असल्याची भीती आहे.

गेल्या चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संपर्कातील संशियत्यांचे कोरोना तपासणी अहवाल हे निगेटिव्ह येत असल्याने येवलेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी रात्री आलेल्या अहवालांनी येवला शहर आणि तालुका वासियांची चिंता पुन्हा वाढली आहे.

कोरोना बाधित 31 जणांमध्ये ग्रामीण रुग्णालयातील 13 कर्मचारी आहेत. तर नव्याने आलेल्या 6 जणांमध्ये पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील 1 महिला कर्मचारी आणि तिचा मुलगा यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण (Yewala Corona New Hotsopt) आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनामुक्त येवला करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागातील अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कुमक देण्याची मागणी येवलेकर करत आहे.

मालेगावात 13 नवे रुग्ण, आकडा 547 वर

मालेगावात आज दुपारी आलेल्या 173 अहवलांपैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, उपचारानंतर 10 रुग्णांचा पहिला रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. मालेगाव मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 547 वर पोहोचली आहे. तर 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 51 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या 13 अहवालात 2 SRPF अमरावतीच्या जवानांसह 6 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.

Yewala Corona New Hotsopt

संबंधित बातम्या : 

तान्ह्या बाळासाठी शहापूरची शिवसेना धावली, पहाटे 3 वाजता उत्तर भारतीय चिमुरड्यासाठी दुधाची व्यवस्था

चालत जाणाऱ्या मजुरांसाठी एसटीकडून मदतीचा हात, मजुरांकडून एसटीचे आभार

वर्ध्यात कोरोनाग्रस्त महिलेच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित 141 जण क्वारंटाईन, 13 गावं सील

मुंबईतून गावी परतला, घरी न जाता थेट शेतात जाऊन राहिला, तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.