AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधल्या 2 ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळा, अन्यथा जीवावर बेतू शकते; का दिला इशारा?

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि एक्स सेक्टर या ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग मुख्यालय तोफखाना आणि देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे या ठिकाणी गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.

नाशिकमधल्या 2 ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळा, अन्यथा जीवावर बेतू शकते; का दिला इशारा?
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 3:01 PM

शैलेश पुरोहित, इगतपुरीः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) आणि एक्स सेक्टर या ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग (Training) मुख्यालय तोफखाना आणि देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे या ठिकाणी गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेलगाव तऱ्हाळे, सोनोशी, अडसरे खुर्द, बारशिंगवे, तळवाडी, कवडदरा, समनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदुरवैद्य, टाकेद बुद्रुक, धामणगाव, नांदगाव बुद्रुक, साकुर, बेलगाव कुऱ्हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरवीर खुर्द, लहवित, अस्वली व नाशिक तालुक्यातील वंजारवाडी या गावांचे मालकी हद्दीतील काही भाग तोफा माऱ्याच्या रेषेत येतात. त्यामुळे हे आवाहन करण्यात आले आहे.

अन्यथा कारवाई करणार

गोळीबार प्रात्यक्षिकाच्या कालावधी दरम्यान संबंधित ‘एक्स सेक्टर’ क्षेत्रात गावातील नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या क्षेत्रात जनावरांनाही जाऊ देवू नये. याबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासनास दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. तशी जाहीर दवंडीही देण्यात येणार आहे. प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहणार नाही. या सूचनेचा भंग केल्यास संबंधित व्यक्तिविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि एक्स सेक्टर या ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग मुख्यालय तोफखाना आणि देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे या ठिकाणी गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये. अन्यथा कायदेसीर कारवाई करण्यात येईल. – भागवत डोईफोडे, अपर जिल्हादंडाधिकारी

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.