‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

प्रभाग रचना ही पूर्णतः वेगळी असल्याने विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचे चिन्ह आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा फायदा कसा करता येईल, याविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. इतर पक्षातील उमेदवार व राष्ट्रवादी पक्षातील उमेदवार यांच्यातील तुलना यावेळी करण्यात आली.

'राष्ट्रवादी'कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
राष्ट्रवादी काँग्रेस.
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 7:05 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीचे (Election) पडघम जोरात वाजताना दिसत आहेत. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. वॉर्डन वॉर्ड पिंजून काढला जात आहे. विविध कार्यक्रम घेतले जातायत. त्यातच या निवडणुकीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात सिडको विभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी कुबेर लॉन्स जुने सिडको येथे करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, दत्ताकाका पाटील, संजय खैरनार आदींची उपस्थिती होती. त्यांनी इच्छुकांचा कौल जाणून घेतला.

300 इच्छुकांची चाचपणी

नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेच्या आधारावर प्रभाग निहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवात केली आहे. प्रभागातील आरक्षण अद्याप जाहीर झाले नसले, तरी संभाव्य आरक्षण व महिला आरक्षण लक्षात घेता चाचपणी करण्यात आली. यावेळी 300 इच्छुक उमेदवारांची चाचपणी पार पडली.

रणनीतीवर मंथन

प्रभाग रचना ही पूर्णतः वेगळी असल्याने विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचे चिन्ह आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा फायदा कसा करता येईल, याविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. इतर पक्षातील उमेदवार व राष्ट्रवादी पक्षातील उमेदवार यांच्यातील तुलना यावेळी करण्यात आली. नाशिकमध्ये नवीन उद्योजकांना आणण्याकरिता व नाशिकच्या सर्वागीण विकासाकरिता नाशिक महापालिकेवर सत्ता येणे गरजेचे असल्याने सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कामांचा फायदा करून घ्या

प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले म्हणाले की, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याकरिता सर्वाधिक निधी आणला. हा इतिहास कोणीही पुसू शकत नाही. भुजबळांनी केलेले विकासकामे जनतेसमोर मांडून महापालिकेवर सत्तेत येण्याची हीच खरी वेळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

फक्त घोषणा केल्या…

माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी भाषणात सांगितले की, महापालिकेतील सत्ताधारी दत्तक नाशिकच्या विधानावरून सत्तेवर आले, परंतु त्यांनी नाशिकवर तिळमात्र प्रेम दाखविले नाही. केंद्राकडून मेट्रोची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारच्या वाट्याचा निधी देऊन देखील केंद्राने त्यांच्याकडील निधीबाबतची घोषणा केलेली नाही. नाशिकमध्ये गेल्या पंचवार्षिकपासून सिडको-सातपूरमध्ये नवीन कंपनी आलेली नाही आणि तसे प्रयत्न मनपा सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केले नाहीत.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.