नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर, 1 हजार 32 जुन्या वाड्यांना नोटीस

नाशिक महानगरपालिकेने शहरातील जुन्या आणि धोकादायक ठरणाऱ्या 1 हजार 32 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे (Nashik old buildings).

नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर, 1 हजार 32 जुन्या वाड्यांना नोटीस
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 3:35 PM

नाशिक : मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी ऐन पावसाळ्यात जुन्या इमारती पडण्याच्या घटना घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही जुन्या धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच नाशिक महानगरपालिकेने अशा जुन्या धोकादायक 1 हजार 32 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे (Nashik old buildings). कोणत्याही जुन्या इमारतीचा पावसाळ्यात अपघात होऊन नुकसान होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने पाऊल उचलले आहे.

नाशिक शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न दरवर्षी ऐरणीवर येतो. पावसाळ्यात अनेक धोकादायक वाडे पडतात. यामुळे अनेकांचा बळीही जातो. काही दिवसांपूर्वीच भद्रकाली परिसरात एक जुना वाडा कोसळल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. अनेक इमारतींना नोटीस बजाहूनही अनेक नागरिक निवाऱ्याचं दुसरं ठिकाण नसल्यानं वाडे रिकामे करत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे असे आणखी अपघात होऊ नये म्हणून महानगर पालिकेने शहरातील अशा संभाव्य धोकादायक 1 हजार 32 वाड्यांना नोटीस बजावली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

महानगरपालिकेने नोटीस बजावलेले वाडे अति धोकादायक आहेत. अशा वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हे वाडे त्वरित खाली करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जे नागरिक धोकादायक वाडा असूनही खाली करणार नाहीत, ते वाडे पाडण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. जे वाडे जुने आणि ज्यांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे अशा वाड्यांना ठिकाणी महानगरपालिका तसे बोर्ड लावणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही स्वतःहून हे वाडे खाली करावेत, असं आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलं आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, नुकत्याच मुंबईत जुन्या इमारतीच्या दुर्घटना घडल्या. मुंबईतील फोर्ट भागात 6 मजली भानुशाली बिल्डिंगचा भाग कोसळून त्यात 9 जणांचा मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात अशा इमारतींचा आढावा घेतला जात आहे. तसेच खबरदारी म्हणून अशा इमारती रिकाम्या करण्यासाठी तेथील रहिवाशांना नोटीस देण्यात येत आहेत. नाशिकमध्ये देखील असंच पाहायला मिळालं.

हेही वाचा :

Mumbai Building Collapse | मुंबईवर धोकादायक इमारतींचं सावट, 7 वर्षात 3,945 इमारती कोसळल्या

Bhanushali Building collapse | दुर्लक्ष नाही, पण आम्ही लोकांना घरातून खेचून बाहेर काढू शकत नाही : महापौर

Bhanushali Building Collapse | भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

Nashik Municipal corporation notice to old buildings

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.