AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या सातपीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस, फक्त 15 दिवसांची मुदत अन्यथा…

नाशिक महानगरपालिकेने सातपीर दर्ग्याला अतिक्रमण हटवण्याची १५ दिवसांची नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दर्गा अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून घोषित आहे. नोटीस न मानल्यास महापालिका स्वतः कारवाई करेल. दर्ग्याचे विश्वस्त वक्फ बोर्डाकडे धाव घेतील का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. नाशिककरांचे लक्ष या प्रकरणावर लागले आहे.

नाशिकच्या सातपीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस, फक्त 15 दिवसांची मुदत अन्यथा...
Nashik Satpir DargahImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2025 | 8:26 PM
Share

नाशिक शहरातील काठे गल्ली सिग्नल परिसरात असलेल्या सातपीर दर्ग्याला नाशिक महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. नाशिक महापालिकेने सातपीर दर्ग्याला मोठी कारवाई करत अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावली आहे. यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये दर्ग्याच्या व्यवस्थापनाला १५ दिवसांच्या आत स्वतःहून केलेले अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, महापालिका स्वतः पोलिस बंदोबस्तात कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेच्या नोटीसमध्ये काय?

नाशिक महापालिकेने नुकतंच सातपीर दर्ग्याला एक नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी अनधिकृत बांधकामाबद्दल भाष्य करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नाशिक महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी ४ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार हजरत सैय्यद सात पीर बाबा दर्गा जनरल वैद्य नगर, काठे गल्ली, नाशिक हा दर्गा ब वर्ग अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यानुसार हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई मनपामार्फत लवकरच सुरु करण्यात येणार असून तत्तपूर्वी संबंधितांनी सदरचे अनधिकृत धार्मिक स्थळ स्वत:हून सदरील नोटीस चिकटवल्यापासून १५ दिवसांच्या आत काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेमार्फत १५ दिवसांनंतर कोणत्याही क्षणी, कोणीतीही पूर्व सूचना न देता सदरचे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जेव्हा दर्ग्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई

महापालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये सातपीर दर्ग्यातील काही भाग हा अनधिकृत असल्याचे नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने याच दर्ग्यावरील काही वादग्रस्त भाग पोलिस संरक्षणात हटवला होता. आता थेट संपूर्ण अनधिकृत भागावर संकेत मिळत असल्याने खळबळ उडाली आहे. या नोटिसीनंतर सातपीर दर्ग्याचे विश्वस्त काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी जेव्हा दर्ग्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाली होती, तेव्हा विश्वस्तांनी वक्फ बोर्डाकडे धाव घेतली होती.

नाशिक शहरातील नागरिकांचे लक्ष

त्यामुळे आता महापालिकेच्या या नोटिसीनंतर विश्वस्त पुन्हा वक्फ बोर्डाचे दरवाजे ठोठावणार की अन्य काही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक महापालिकेची ही कारवाई येत्या काही दिवसांमध्ये काय वळण घेते, याकडे नाशिक शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.