अवकाळीचा फेरा सुरूच! क्षणात सुखाचा संसार मोडला, महिलेचा मृत्यूची घटना ऐकून जिल्ह्यात हळहळ, नेमकं काय घडलं?
अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेती पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालेले असतानाच जीवित हानी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नाशिक : राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाचा आणि गारपीटीच्या फेरा अद्यापही संपलेला नाहीये. नाशिक जिल्ह्यात पावसाच्या दरम्यान वीज कोसळून दोन तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अगदी तशीच घटना नाशिकच्या सिन्नर मध्येही दुर्दैवी घटना घटना घडली आहे. त्यामुळे सुरू असलेला सुखी संसार एका क्षणात मोडला गेला आहे. घराच्या बाहेर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी महिला गेली असतांना अंगावर वीज पडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. सिन्नर तालुक्यातील रामपूर जवळील पुतळेवादी परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागील आठवड्यापासून जिल्ह्यात सायंकाळच्या दरम्यान कुठे ना कुठे पाऊस पडत आहे. त्यात काही ठिकाणी वादळी वारा ते वीजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. त्यातच कपडे वाळत टाकलेले होते ते काढण्यासाठी गेली असतांना वीज पडून तिचा मृत्यू झाला आहे.
वीज पडल्यानंतर विवाहिता वैशाली विजय कवडे यांचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्यानंतर त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. खरंतर लिंबाच्या झाडाला बांधलेल्या दोरीवर त्यांनी कपडे वाळण्यासाठी टाकले होते. त्याच वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने त्या बाहेर गेल्या होत्या.
बाहेर वाळत असलेले कपडे काढून घरात आणते म्हणून त्यांनी कुटुंबातील व्यक्तीना सांगून बाहेर पडल्या. सगळीकडे पाऊस पडत असल्याने वाऱ्याने उडून जाणाऱ्या आणि ओल्या होतील अशा वस्तु घरात घेण्यासाठी लगबग सुरू असतांना हा प्रकार घडला आहे.
खरंतर ग्रामीण भागात अवकाळी पाऊसाने कहर केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वादळी वारा असल्याने घराचे किंवा पोल्ट्रीचे पत्रेही उडून गेले आहे. काही ठिकाणी जनावरे जखमी झाली आहे. तर कोंबडयांचा मृत्यू झाला आहे.
सिन्नरच्या रामपूर भागात पुतळेवादी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अक्षरशः आभाळ फाटल्या सारखी स्थिती होती. त्यातच जीवित हानीही अवकाळी पाऊसामुळे झाली आहे. त्यात वैशाली कवडे या त्यात गतप्राण झाल्या आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
खरंतर वीज ही झाडावर कोसळली होती. त्याच वेळी वैशाली या देखील वाळण्यासाठी टाकलेले कपडे काढत घरात येणार होत्या त्याच वेळी त्यांना धक्का बसला. कुटुंबातील आणि आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना दवाखान्यात नेले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.