राहुल गांधी सारखंच गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत घडणार? ‘त्या’ टीकेवरून कारवाईची मागणी, पोलिसांना कुणाचं निवेदन?

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली टीका आणि नंतर केलेली कारवाई बघता गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राहुल गांधी सारखंच गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत घडणार? 'त्या' टीकेवरून कारवाईची मागणी, पोलिसांना कुणाचं निवेदन?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 12:35 PM

नाशिक : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक मध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून हल्लाबोल केला होता. यामध्ये सर्व चोर मोदी आडनावाचेच का असा सवाल उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून सुरत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर राहुल गांधी यांना त्या प्रकरणी जामीनही मिळाला. मात्र, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानं आणि राहुल गांधी दोषी ठरवल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. अगदी तशाच पद्धतीने गोपीचंद पडळकर यांच्यावरही कारवाई व्हावी अशा स्वरूपाची मागणी आता नाशिकमध्ये करण्यात आली आहे.

श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठानकडून नाशिक पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पवार आडनावाबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून ही मागणी करण्यात आली आहे.

पवार आडनावाविषयी आणि पवार कुळाविषयी अपमानकारक, बदनामीकारक आणि धमकीच वक्तव्य केल्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्यावर कलम 295 आणि 298 या तरतुदीनुसार कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

खरंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल करत असतात. अनेकदा पडळकर यांनी पवार कुटुंबियावर जहरी टीका केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी एक टीका केली होती. तीच त्यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागलीये, ती काढून टाकावी लागेल अशा स्वरूपाचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. हीच टीका त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांच्या याच टीकेवर आक्षेप घेण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

बुद्धि पुरस्कर व दृष्ट भावनेच्या उद्देशाने गोपीचंद पडळकर यांनी हे व्यक्तव्य केल्याचं निवेदनात म्हंटले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील समस्त पवार कुळाच्या बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे.

पवार वर्गाची बदनामी यामध्ये झाली असून मानसिक त्रास यामुळे होत आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं निवेदनच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावाने उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्याकडे दिले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.