AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये राष्ट्रीय मतदान जागृती स्पर्धेचे आयोजन; निवडणूक विभागाकडून मिळणार रोख बक्षीस, कसे व्हाल सहभागी?

नाशिकमध्ये राष्ट्रीय मतदान जागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके देवून गौरविण्यात येणार असून, प्रत्येक श्रेणीत विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके असणार आहेत. स्पर्धकांनी तपशिलवार मार्गदर्शक तत्वे, नियम व अटी यांच्या माहितीसाठी...

नाशिकमध्ये राष्ट्रीय मतदान जागृती स्पर्धेचे आयोजन; निवडणूक विभागाकडून मिळणार रोख बक्षीस, कसे व्हाल सहभागी?
voters
| Updated on: Feb 26, 2022 | 7:05 AM
Share

नाशिकः एका मताने सरकार पडू शकते, याचा इतिहास भारतीय लोकशाही पाहिला आहे. अनेक छोट्या-छोट्या निवडणुकांमध्ये तर ईश्वरी चिठ्ठीमुळे अनेकांच्या विजयाचे भाग्य फळफळते. एक मत लाख मोलाचे असते म्हणतात. आता येणाऱ्या काळात महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. हेच ध्यानात घेत नाशिकमध्ये (Nashik) निवडणूक (Election) विभागातर्फे राष्ट्रीय मतदान जागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिन (National Polling Day) साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ येत्या 15 मार्च 2022 पर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील जास्तीत जास्त मतदारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी केले आहे.

कसे व्हाल सहभागी?

स्पर्धेत प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके देवून गौरविण्यात येणार असून, प्रत्येक श्रेणीत विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके असणार आहेत. स्पर्धकांनी तपशिलवार मार्गदर्शक तत्वे, नियम व अटी यांच्या माहितीसाठी https://ecisveep.nic.in/contest या संकेतस्थळाला भेट द्यावी. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलासह voter-contest@eci.gov.in यावर मेले कराव्यात. प्रवेशिका ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2022 आहे

स्पर्धा कोणत्या?

12 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्जनशील अभिव्यक्तिद्वारे देशातील प्रत्येक मताचे महत्व पटवून देणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. SVEEP (Systematic Voteres Education and Electrol Participation) या कार्यक्रमांतर्गत मतदाराचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती करणे यासाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा, व्हिडीओ चित्रण स्पर्धा, भित्तीचित्र (पोस्टर) स्पर्धा, गायन स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धां आयोजित केल्या आहेत. सर्व वयोगटातील मतदरांसाठी या स्पर्धा खुल्या असणार आहेत.असेही, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक स्वाती थविल यांनी कळविले आहे.

दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिन (National Polling Day) साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ येत्या 15 मार्च 2022 पर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील जास्तीत जास्त मतदारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा. – स्वाती थविल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक

सर्व स्पर्धा खुल्या

– प्रश्नमंजूषा स्पर्धा

– व्हिडीओ चित्रण स्पर्धा

– भित्तीचित्र (पोस्टर) स्पर्धा

– गायन स्पर्धा

– घोषवाक्य स्पर्धा

इतर बातम्याः

युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!

युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?

उपमहापौरासह भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला; नाशिकमध्ये फोडाफोडीला वेग!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.