तापमानाचा पारा वाढतोय, महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर, खबरदारीचा उपाय म्हणून घेतला महत्वाचा निर्णय, जाणून घ्या
थंडीचा रेकॉर्ड असणाऱ्या शहरात देखील तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील धास्ती घेतली असून रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला जात आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत चालला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन केले जात असताना खारघर येथे 14 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यामध्ये देशातील आठ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी प्रशासनाच्या वतीने तयारी केली जात असतांना त्या उष्णतेच्या लाटेचा सामना महाराष्ट्र राज्यालाही करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिथे जिथे तापमाणाचा वारा वाढत आहे तिथे स्थानिक प्रशासनाच्या वतीने तयारी केली जात आहे. सरकारी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी कक्ष उभारण्यात आले आहे. तर खाजगी रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
खारघर येथील घटना आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने पालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक सरकारी रुग्णालयात पाच बेड राखीव ठेवण्यात आले आहे. उष्माघाताचे रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची तजबिज केली जात आहे.
नाशिक शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात ही तयारी करण्यात आली आहे. सध्यस्थितीत 20 बेड राखीव ठेवण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर हा काही विशेष आवाहन देखील केले आहे.
दुपारच्या वेळी शक्यतोवर घराच्या बाहेर पडणं टाळा, उन्हात जाणार असाल तर टोपीचा वापर करा. चष्म्याचा वापर करा. याशिवाय गडद रंगाचे कपडे परिधान करू नका असेही आवाहन केले जात आहे. भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे.
नाशिक शहरासह मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार यांसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी बाळगली जात आहे. उष्माघाताचे रुग्ण आढळून आल्यास तात्काळ उपचार कसे करता येईल यासाठी प्रयत्न करायचे याची रणनीती आखली जात आहे.
नागरिक दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर पडणे टाळत असले तरी जे नागरिक बाहेर पडत आहे ते शीतपेयांचे दुकान गाठून तापमानामुळे होणारी अंगाची लाही लाही कमी करत आहे. उसाचा रस, थंड पेय आणि पदार्थ यांच्यापासून गारवा निर्माण करत आहे.
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये उन्हाळ्यात रेकॉर्डब्रेक तापमान बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत असून नागरिक काळजी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनानेही धास्त घेतल्याचे दिसून येत आहे.