त्रंबकेश्वरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, विश्व विरासत दिनाचं औचित्य साधून पोस्ट खात्याचा महत्वाचा निर्णय काय?

त्र्यंबकेश्वर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून नाशिकसह त्र्यंबक नगरीत नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात असून भारतीय पोस्ट खात्याच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

त्रंबकेश्वरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, विश्व विरासत दिनाचं औचित्य साधून पोस्ट खात्याचा महत्वाचा निर्णय काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 12:58 PM

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या त्र्यंबकेश्वराचे लाखों भाविक आहे. त्यांच्यासाठी खरंतर आनंदाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता भारतीय पोस्ट कार्ड आणि पोस्ट तिकिटावर देखील त्रंबकेश्वर मंदिर असणार आहे. भारतीय पोस्ट खात्याकडून त्रंबकेश्वर मंदिराचे पोस्ट कार्ड आणि पोस्ट तिकीट जारी करण्यात आले आहे. विश्व विरासत दिनाचं औचित्य साधून पोस्ट खात्याने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर संपूर्ण नाशिकमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय पोस्ट खात्याने जाहीर केलेल्या निर्णयामुळे त्र्यंबक राजाला एक प्रकारे नमस्कार करण्यात आल्याचे बोललं जात आहे.

खरंतर त्र्यंबकेश्वरला दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिण्यात मोठी गर्दी भाविकांची होत असते. नाशिक हे पर्यटन केंद्र असल्याने अनेक भाविक दोन्ही बाबींची सांगड घालत असतात.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंगांपैकी म्हणून त्र्यंबकेश्वर जगभरात ओळखले जाते. त्यामुळे ज्योतिर्लिंगांना भारतीय पोस्ट कार्ड आणि तिकीटावर स्थान देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतीय पोस्ट खात्याचा हा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय पोस्ट खात्याच्या वतीने यापूर्वी अनेक महापुरुषांचे छायाचित्रे छापून पोस्ट कार्ड आणि पोस्ट तिकीट प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आगळी वेगळी संकल्पना भारतीय पोस्ट खात्याने राबविली असून तीचं ठिकठिकाणी कौतुक केले जात आहे.

नाशिकपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे चित्र थेट भारतीय पोस्ट खात्यावर छापण्याचा निर्णय झाल्याने त्र्यंबक नगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे त्र्यंबक नागरिक या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर खरंतर नेहमीच चर्चेत असते. कधी पुरोहितांच्या राड्यामुळे तर कधी मंदिरातील दर्शनाच्या रांगेवरून, आता पुन्हा भारतीय पोस्ट खात्याने घेतलेल्या निर्णयावरुन चर्चेचा विषय ठरत असून भोले भक्त या निर्णयाचे स्वागत सोशल मिडियावर करत आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असल्याने भारतीय पोस्ट खात्याने पहिला मान त्र्यंबकेश्वर दिला आहे. त्यामुळे पहिली छपाई भारतीय पोस्ट खात्याने जारी केली असून पोस्ट कार्ड आणि पोस्ट तिकीट असे दोघांवर त्र्यंबकेश्वर मंदिर असणार आहे.

विश्वस्त मंडळाने याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी संपूर्ण नाशिकमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळ यावर काही आक्षेप घेते की स्वागत करते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.