मतदानासाठी नेत्यांकडून शेतकऱ्यांची उठाठेव, थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था, बाजार समितीच्या निवडणुकीला ग्लॅमर

बाजार समितीच्या निवडणुकीत सध्या ग्लॅमर आलं आहे. शेतकरी मतदारांची केलेली व्यवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत असून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

मतदानासाठी नेत्यांकडून शेतकऱ्यांची उठाठेव, थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था, बाजार समितीच्या निवडणुकीला ग्लॅमर
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 1:54 PM

नाशिक : निवडणुका म्हंटलं की मतदारांची नेत्यांकडून अक्षरशः उठाठेव केली जाते. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे मोजकेच मतदान असले तर मग प्रश्नच येत नाही. मतदार हा खरोखरच राजा होत असतो. सध्या राज्यात बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये आज मतदान पार पडत आहे. यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदारांची अक्षरशः पळवा पळवी केली जात आहे. त्यामध्ये काही मतदारांना तर अक्षरशः पंचतारांकित हॉटेल मध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून न जाणारे नेते आज मात्र खास व्यवस्था करतांना दिसून येत आहे.

राज्यात बाजार समितीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये अनेक नेत्यांसाठी ह्या निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच निवडणूक तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना अशी पाहायला मिळत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व असावे यासाठी अनेक नेते निवडणुकीत आपले नशीब आजमावत असतात. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी विकास पॅनल जो भाजपच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी शेतकरी मतदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले होते.

हे सुद्धा वाचा

शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. मतदारांना मारहाण केल्याचा आरोप करत गुंड असल्याचे म्हंटले आहे. भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी हा आरोप केला आहे.

मतदार शेतकाऱ्यांमुळे आमदार खासदार होता येतं असं म्हणत त्यांनीच आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असे सांगत दिनकर पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे निवडणुकीला नाशिकमध्ये ग्लॅमर आल्याचे पाहायला मिळालं.

खरंतर सरकार स्थापन होत असतांना आमदार खासदार यांचा घोडेबाजार होऊ नयेयासाठी अशी खास व्यवस्था केली जाते. तर दुसरीकडे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांना अशी खास व्यवस्था केली जाते. त्यामुळे पहिल्यांदाच बाजार समितिच्या निवडणुकीत हे वेगळं चित्र पाहायला मिळाले आहे.

त्यामुळे शेतकरी संकटात असतांना त्यांच्याकडे कधी ढुंकुनही न पहाणारे नेते आता शेतकरी मतदारांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हेच मतदार आता कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.