माय माऊलीच्या मदतीला धावली ‘खाकी’, रागाच्या भरात पतीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आली होती पण…

पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला आलेला अनुभव हा कदाचित बोटावर मोजण्या इतक्याच नागरिकांनी पाहिला असेल पण चर्चा मात्र शहरभर झाली आहे.

माय माऊलीच्या मदतीला धावली 'खाकी', रागाच्या भरात पतीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आली होती पण...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 5:02 PM

नाशिक : पोलिस ठाण्यात जर कुणी तक्रार देण्यासाठी गेलं तर अनेकदा त्यांना पोलिसांच्या कामाचा वाईट अनुभव येत असतो. पोलिसांकडून उडवा उडवीचे उत्तरे, तक्रारीची दखल न घेणे, मोठ्या आवाजात बोलून तक्रारदारालाच गप्प करणं, प्रतिसाद न देणं अशा घटना अनेकदा समोर आल्या आहेत. पण नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांचा एक वेगळाच अनुभव आला आहे. ज्याची चर्चा पोलिस वर्तुळासह नाशिकमध्ये रंगू लागली आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यातील दुरावा निर्माण होत असतांना नाशिकमधील घटना कौतुकास्पद ठरत आहे.

नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या बाहेर एक वृद्ध महिला आपल्या पतीच्या विरोधात तक्रार करायची म्हणून पोलिस ठाण्यापर्यन्त आली होती. मात्र, उपाशी पोटी असल्याने आणि पायाला लागलेले असल्याने महिला भोवळ येऊन पोलिस ठाण्याच्या बाहेर पडली होती.

पोलिस ठाण्यात बसलेल्या पोलिसांना ही बाब कळताच सर्वांनी तिच्याकडे धाव घेतली. आणि पोलिस निरीक्षक सुरेश बिजली यांनाही सांगण्यात आल्याने ते देखील आले. लागलीच महिलेला पाणी पाजण्यास सांगितले, पैसे देऊन नाश्ता आणण्यास सांगितले. महिलेची भोवळ गेल्यानंतर बिजली यांनी चौकशी केली.

हे सुद्धा वाचा

महिलेच्या पायाला लागलेले असल्याने त्यांनी तात्काळ गाडी काढून महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. याबाबत पोलिसांनी चौकशी करत असतांना महिलेचे आणि पतीचे भांडण झाले होते. त्यात पतीने महिलेला मारले होते.

अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश बिजली यांनी स्वतः याबाबत पुढाकार घेतला. उपचार करून महिला सुस्थितीत आल्यानंतर महिला जिथे राहते तो भाग ग्रामीण पोलिसांचा होता, त्यामुळे ग्रामीण पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.

खरंतर पोलिस ठाण्याच्या बाहेर हा संपूर्ण प्रकार घडल्याने मोठी गर्दी झाली होती. पण पोलिस निरीक्षक सुरेश बिजली यांनी स्वतः याबाबत घेतलेला पुढाकार पाहून खाकीच्या आड दडलेल्या माणुसकीचे दर्शन झाले आहे. सुरेश बिजली यांनी महिलेला आणखी मदत केली असली तरी याबाबत त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही.

अनेक पोलिस अधिकारी असतात की सहसा त्यांचे असलेले काम सुद्धा ते पार पाडत नाही. शिवीगाळ करत दमदाटी करत खाकीचा धाक दाखवतात. मात्र, नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदावर नुकतेच रुजू झालेले सुरेश बिजली यांनी कौतुकास्पद काम केले आहे. त्यामुळे सुरेश बिजली यांनी दाखवलेल्या माणुसकीची चर्चा होत आहे.

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.