मास्क सक्तीबाबत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार स्पष्टचं बोलल्या, वाढत्या कोरोनावर केंद्राची तयारी काय?
वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता केंद्र सरकारचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे. त्यादरम्यान मास्क बाबतही डॉ. भारती पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
नाशिक : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात असताना केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडून ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे. डॉ. भारती पवार यांच्याकडून नुकताच नाशिक जिल्ह्यातही आढावा घेण्यात आलेला आहे. कोरोना रुग्णांची स्थिती पाहता नाशिकमध्ये 90 च्या वर गेल्यानंतर भारती पवार यांनी आरोग्य विभागाला काही सूचना केलेल्या आहेत. त्यामध्ये राज्य सरकारने मास्क याबाबत निर्णय घेण्याचा घ्यावा असेही मत डॉ. भारती पवार यांनी दिलेला आहे. मास्क बाबत भारतीय पवार यांनी त्यांचं मत मांडत मोठं वक्तव्य केले आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या 90 च्या वर कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर आढावा घेत असताना कोरोनाचा नवा विषाणू आहे का याबाबत सर्वेक्षण करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.
गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाण टाळा, याशिवाय जर गेलाच तर त्या ठिकाणी जाताना मास्क लावून जावे अशा स्वरूपाचं आवाहन डॉ. भारती पवार यांनी करत मास्कबाबत संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण देशभरात कोरोना रुग्ण वाढत असताना मागील काही वर्षांपूर्वीचा इतिहास पाहता मुंबई आणि मालेगाव या ठिकाणी कोरोनाचं हॉटस्पॉट असल्याचे पाहायला मिळालं होतं विलक्षण पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली होती.
पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्क वापरावा असे आवाहन केले जात आहे. मास्क बाबत सक्ती नसली तरी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असे म्हंटलं आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाची सद्यस्थिती पाहता 90 च्या वर कोरोना बाधित रुग्ण असल्याने आणि बहुतांश कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून औषधांचा साठा, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या, लसीकरण आणि बेडची व्यवस्था याबाबत नुकताच डॉ. भारती पवार यांनी आढावा घेतला आहे.
आगामी काळात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली तर त्या दृष्टीने काय उपाययोजना करायच्या याबाबत केंद्र सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सणांची अंमलबजावणी कशी करायची याबाबत डॉक्टर भारती पवार यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार सतर्क असल्याचे दिसून येत आहे.