चाचा चारोस्कर ते कडक्या बोडके, नाशिक पोलीस आयुक्तांचा धडाका सुरुच, सात गुंड तडीपार

जो जसा गुन्हा करेल, त्याला तशी शिक्षा मिळेल, हा नाशिक पोलीस आयुक्तांचा फेमस डायलॉग. (Nashik Deepak Pandey Gangsters)

चाचा चारोस्कर ते कडक्या बोडके, नाशिक पोलीस आयुक्तांचा धडाका सुरुच, सात गुंड तडीपार
दीपक पांडेय, पोलीस आयुक्त, नाशिक
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 1:16 PM

नाशिक : नाशिक शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी चांगलाच दणका दिला आहे. एकाच दिवसात शहरातील सात गुन्हेगार तडीपार केले. नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दीपक पांडे सुरुवातीपासूनच अॅक्शन मोडमध्ये असल्याचं दिसलं. (Nashik Police Commissioner Deepak Pandey action against Gangsters)

दीपक पांडेंची कारवाई कोणावर?

सुरज उर्फ चाचा चारोस्कर, गणेश धात्रक, विजय गांगोडे, गणेश धोत्रे, पप्पू भोंड, गणेश आहेर, सागर उर्फ कडक्या बोडके हे सराईत गुन्हेगार म्हसरुळ पंचवटी परिसरात दहशत निर्माण करत होते. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. अजूनही काही गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत.

गुन्हेगारांवर ‘मुळशी पॅटर्न’ कारवाई 

दीपक पांडे यांनी सप्टेंबर 2020 मध्ये विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. जो जसा गुन्हा करेल, त्याला तशी शिक्षा मिळेल, हा नाशिक पोलीस आयुक्तांचा फेमस डायलॉग. नाशिककरांना पोलीस आयुक्तांच्या या डायलॉगची सध्या प्रचिती येत आहे. कारण ,नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांवर आता थेट ‘मुळशी पॅटर्न’ कारवाई करायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास सराईत गुन्हेगारांच्या घरावर पोलीस पथकाने छापे घातले होते. त्यावेळी सहा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत, गावठी कट्टयासह 20 प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आली होती.

गुंडांना घराबाहेरच उठाबश्यांची शिक्षा

याआधी, नाशिक शहरातील गुंडांची त्यांच्याच परिसरातून धिंड काढत त्यांना उठाबशा काढायला लावल्या होत्या. अशाप्रकारे परिसरात असलेली गुंडांची दहशत पोलिसांनी संपुष्टात आणली. पोलीस आयुक्तांच्या या दबंग कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. (Nashik Police Commissioner Deepak Pandey action against Gangsters)

जसा रूग्ण तसा इलाज

जसा रूग्ण तसा इलाज ही नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची स्टाईल. जो जसा गुन्हा करेल त्याला त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर देण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे ओळखले जातात. नाशिककरांना हा अनुभव शहरात घडलेल्या घटनेनंतर आला.

नाशिकच्या द्वारका परिसरात एका टोळक्याने युवकाची हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणातल्या 8 आरोपींना शिताफीने अटक तर केलीच, शिवाय त्यांच्याच परिसरातून त्यांची धिंड काढत आणि परिसरातल्या लोकांसमोर त्यांना उठाबशा काढायला लावत अद्दल घडवली. सुरुवातीला मग्रुरीने वागणारे हे संशयित आरोपी पोलिसांनी खाक्या दाखवताच चांगलेच वठणीवर आले.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये टोळी युद्ध संपवण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

(Nashik Police Commissioner Deepak Pandey action against Gangsters)

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.