नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
नाशिक : वाढत्या अपघातांची संख्या पाहता नाशिक पोलिसांनी शहरात हेल्मेटसक्ती केली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यापूर्वीच या निर्णयाची माहिती दिल होती. 13 मे म्हणजे आजपासून ही हेल्मेटसक्ती अंमलात आली असून शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलीस नियमाची काटेकोरपणे अंमलबाजवणी करत आहेत. नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीसह बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी विशेष मोहीम हाती घेतली […]
नाशिक : वाढत्या अपघातांची संख्या पाहता नाशिक पोलिसांनी शहरात हेल्मेटसक्ती केली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यापूर्वीच या निर्णयाची माहिती दिल होती. 13 मे म्हणजे आजपासून ही हेल्मेटसक्ती अंमलात आली असून शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलीस नियमाची काटेकोरपणे अंमलबाजवणी करत आहेत. नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीसह बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना महामार्गांवर हेल्मेटसक्ती केली होती. यानंतर नाशिक शहरातही हा निर्णय घेण्यात आलाय. शहरात वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एप्रिलपर्यंत रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला, 88 गंभीर तसेच 31 किरकोळ अपघातात 183 जण जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघाताचं प्रमाण काही अंशी कमी असलं तरी ते नियंत्रणात आणण्यासाठी शहर वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस सक्रिय झाले आहेत.
विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, विनासीटबेल्ट चारचाकी चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा विविध कारणांमुळे अपघात होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय. त्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींवर अंमलबजावणी सुरु झाली आहे. दुचाकी अपघातात मृत्यू झालेल्या 38 जणांपैकी 35 जणांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं. त्यामुळे हेल्मेटचा वापर किती आवश्यक आहे ते याच आकडेवारीतूनच दिसून येतं.
विनापरवाना वाहन चालवणे, दारु पिऊन वाहन चालवणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन, एकेरी वाहतुकीच्या मार्गावर वाहन चालवणे, ट्रिपल सीट, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत अपघाती मृत्यू झाला, तर वाहनचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याचा परवाना निलंबनाची कारवाई करणात येईल. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असं विश्वास नांगरे पाटलांनी निर्णयाची माहिती देताना सांगितलं होतं.