60 वर्षीय वृद्ध महिलेवर 22 वर्षीय तरुणाकडून अनैसर्गिक अत्याचार, संतापजनक घटनेनं नाशिक हादरलं
खरंतर आरोपी हा पीडितेच्या नातवाच्या वयाचा आहे. आरोपीने वयाचे भान न ठेवतात वृद्धेवर अत्याचार केल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक : नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक माणुसकीला काळिमा फसणारी घटना धडली आहे. 22 वर्षीय तरुणाने 60 वर्षीय वृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यातील पीडित महिलेने अत्याचार केल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून उपनगर पोलीसांनी साहिल नाना आवारे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार, जीवे ठार मारण्याची धमकी असा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेला अर्धांगवायुचा झटका आलेला होता. पीडित वृद्ध महिला ही पत्र्याच्या शेडमध्ये एकटीच राहते. तिला चालताही येत नाही. तीची सर्व देखभाल भाऊ आणि मुलासह पत्नी करत आहे. वृद्ध महिला ही झोपतांना पत्र्याच्या शेडला दगड लावून झोपते. याच दरम्यान ती एकटी असल्याची संधी पाहून साहिल याने शेडमध्ये प्रवेश करत अत्याचार केले आहे.
60 वर्षीय पीडित महिला ही रात्री घरात एकटी झोपलेली असल्याचे पाहून मध्यरात्री परिसरातच राहणार साहिल आवारे यांनी शेडमध्ये दरवाजा ढकलून प्रवेश केला.
वृद्ध महिलेने घरात प्रवेश केला म्हणून विचारपूस केली त्याच वेळी दरवाजाला लावलेला दगड उचलून डोक्यात टाकून मारेल अशी धमकी दिली आणि पीडित महिलेवर अत्याचार केले.
संशयित आरोपी इथवरच थांबला नाही, त्याने अनैसर्गिक अत्याचार करत मोबाइलमध्ये चित्रीकरण केले, आणि कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारेल अशी धमकी दिली.
खरंतर आरोपी हा पीडितेच्या नातवाच्या वयाचा आहे. आरोपीने वयाचे भान न ठेवतात वृद्धेवर अत्याचार केल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपासून संशयित आरोपी हा पीडित महिलेच्या घराबाहेर फिरत होता, नशा करून तो रात्रीचा फिरत असल्याचेही तपासात समोर आले आहे.