Nashik |नाशिकमध्ये 52 हजार 324 नवमतदार; एकूण संख्या तब्बल 46 लाखांच्या पुढे, पण दुबार नावांचे काय?

नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणूक झाली. आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत असून, ती कधी जाहीर होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Nashik |नाशिकमध्ये 52 हजार 324 नवमतदार; एकूण संख्या तब्बल 46 लाखांच्या पुढे, पण दुबार नावांचे काय?
voters
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 7:05 AM

नाशिकः नाशिकमध्ये तब्बल 52 हजार 324 मतदारांची वाढ झाली असून, जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या थेट 46 लाख 2 हजार 937 वर पोहचली आहे. आगामी महापालिका निवडणुका ध्यानात घेता प्रशासनाने मतदार नोंदणी मोहीम राबवली होती. त्यात ही वाढ झाल्याचे समोर आले आहे.

महिलांची संख्या जास्त

नवमतदारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. त्यात 26 हजार 847 महिला, तर 25 हजार 427 पुरुष मतदार असल्याचे समोर आले आहे. नवमतदारांची सर्वाधिक वाढ ही नाशिक पू्र्व विधानसभा मतदार संघात झाली आहे. येथे 9 हजार 376 मतदार वाढले आहेत. तर आता सर्वाधिक मतदार नाशिक पश्चिम मतदार संघामध्ये आहेत. त्यांचा आकडा 4 लाख 15 हजार 72 वर गेला आहे.

घोळ झाला उघड

नाशिकमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील दुबार नावाचा मुद्दा गाजतोय. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन मतदार संघाच्या याद्यांमध्ये शे-दोनशे नव्हे, तर चक्क तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या पथकाने हा घोळ उघडकीस आणला आहे. त्यांनी तीन महिन्यांत मतदार यांद्याची अक्षरशः छाननी केली. तेव्हा नाशिक पश्चिम मतदारसंधात 1 लाख 22 हजार 242 मतदार दुबार आढले. नाशिक पूर्व मतदारसंघात 88 हजार 932 आणि नाशिक मध्य मतदारसंघामध्ये 76 हजार 319 मतदार दुबार आढळले आहेत.

फक्त 73 हजार नावे वगळली

मतदार यादीतील दुबार नावांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबवली. याअनुषंगाने नागरिकांनी दुबार नावे कमी करण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मतदार यादीमध्ये कोणी जाणीवपूर्वक दुबार नावे सुरू ठेवल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा व्यक्तिंविरोधात निवडणूक कायद्या अंतर्गत फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते, असा इशाराही दिला. मात्र, या मोहिमेत जवळपास 73 हजार नावे वगळली आहेत. मात्र, इतर दुबार नावांचे काय आणि ती कधी वगळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिका निवडणूक कधी?

नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणूक झाली होती. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आता नाशिक महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत असून, ती कधी जाहीर होणार, याकडे लक्ष लागले आहे.

इतर बातम्याः

Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात

Nashik Corona|नाशिकरांसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे…राज्याच्या आरोग्य सचिवांचा काय आहे इशारा?

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.