Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?

नाशिकमध्ये गुरुवारी गंगापूर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशनच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?
ठाणे शहरातील काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 6:05 AM

नाशिकः नाशिककरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. शहरामध्ये आज पाणीपुरवठा (water supply) होणार नसल्याने नागरिकांना निर्जळीला सामोरे जावे लागेल. शिवाय शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या पाण्याचे नियोजन करून ठेवा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या गंगापूर आणि मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम काढण्यात आले आहे. त्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

उद्या कमी दाबाने पुरवठा

नाशिकमध्ये गुरुवारी गंगापूर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशनच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. मीटरिंग क्बुबिकल, एचटी व एलटी ट्रान्सफॉर्मर यासह विविध उपकरणे बदलण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. सोबतच मुकळे धरण विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून जाणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या काळात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 21 जानेवारी रोजीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यानंतर शनिवारपासून सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गावठाणध्ये दिलासा

नाशिकमध्ये पाण्याची काही कमतरता नाही. यंदा तर पावसाने कहर केला. दिवाळीपर्यंत त्याचे थैमान सुरू असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र, इतके असूनही नाशिक-पंचवटीच्या गावठाण भागामध्ये म्हणजेच जुन्या नाशिकमध्ये नेहमी पाणी टंचाई जाणवते. त्याचे कारण म्हणजे इथे चोवीस तास पाणीपुरवठा होत नाही. हे पाहता महापालिका आयुक्त कैलास जाधव सक्रिय झाले आहेत. त्यांनी या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडाचा प्रयोग राबविण्याची निर्णय घेतल्याचे समजते. या प्रयोगाने गावठाणात पाणी मोजणीचा मार्गही मोकळा होणार आहे.

स्काडा सिस्टीम राबवणार

नाशिक-पंचवटी गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली योजना रद्द करण्यात आली आहे. आता नव्या वर्षात स्काडा पद्धती आणण्यासाठी आयुक्तांनी पावले उचलली आहेत. त्यामुळे धरणातून थेट पाण्याच्या टाकीपर्यंत जाणाऱ्या पाण्याची मोजणी करणे सोपे होणार आहे. खरेतर पाण्याची अचूक मोजणी करण्यासाठी म्हणूनच स्काडा सिस्टीमसाठी दोन वर्षांपूर्वी निविदा काढली. मात्र, त्यातील अटी, शर्थीत अनेक बदल झाले. हे सारे संशयास्पद वाटल्याने त्या निविदा रद्द करण्यात आल्या. आता त्यानंतर पुन्हा एकदा स्काडा सिस्टीम राबवण्यात येणार आहे. त्याचा फायदा नाशिक आणि पंचवटी गावठाणाला होऊन तिथे चोवीस तास पाणी मिळेल.

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?

Agri | वायदे बाजार बंदी हटवा, जीएम तंत्रज्ञानाला परवानगी द्या; स्वतंत्र भारत पक्षाचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.