नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसचे 23 रुग्ण; कोरोनाच्या 783 रुग्णांवर उपचार सुरू
नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसच्या 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 842 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नाशिकः नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसच्या 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 842 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 783 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 4 ने घट झाली आहे. तसेच आतापर्यंत 8 हजार 647 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 57, बागलाण 3, चांदवड 31, देवळा 4, दिंडोरी 26, इगतपुरी 1, कळवण 6, मालेगाव 4, नांदगाव 11, निफाड145, सिन्नर 142, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 5, येवला 73 असे एकूण 509 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 251, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 16 तर जिल्ह्याबाहेरील 7 रुग्ण असून असे एकूण 783 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 272 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.01 टक्के, नाशिक शहरात 98.16 टक्के, मालेगाव मध्ये 97.05 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.74 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.70 इतके आहे. नाशिक ग्रामीण 4 हजार 174 नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 3 हजार 990 मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 647 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना काळात वणीच्या सप्तशृंगीगडावरील मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.
इतर बातम्याः
Maharashtra Bandh : लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजारपेठा बंदमध्ये सहभागी; कोट्यवधींचे व्यवहार तुंबलेhttps://t.co/G8rxwJyYDF#MaharashtraBandh|#LasgaonBazarSamiti|#NashikBazarSamiti|#ShivSena|#NCP|#Congress|#BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021