Highway Agitation | स्वातंत्र्य दिनापूर्वी करा महामार्गाची दुरुस्ती, अन्यथा राष्ट्रवादी करणार अनोखं आंदोलन, आंदोलनाची नाशिकमध्ये चर्चा

Highway Agitation | मुंबई ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनोखं आंदोलन करणार आहे.

Highway Agitation | स्वातंत्र्य दिनापूर्वी करा महामार्गाची दुरुस्ती, अन्यथा राष्ट्रवादी करणार अनोखं आंदोलन, आंदोलनाची नाशिकमध्ये चर्चा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 3:10 PM

Highway Agitation | पावसाने (rain)दमदार हजेरी लावल्याने राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) खड्यांचे ग्रहण लागले आहे. खड्यातून प्रवास करताना वाहनधारकांची चांगलीच तारंबळ उडत आहे. घनघोर पावसामुळे आणि खड्यांमुळे अनेकदा वाहतूक मंदावते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पावसाळीपूर्व काम न केल्याने मुंबई नाशिक महामार्गाचे पितळ लगेच उघडे पडले. वाहनधारकांना जीव मुठ्ठीत घेऊन या मार्गावरुन प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांची ही कसरत पाहता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनाद्वारे या खड्यांकडे लक्ष्य वेधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे स्वातंत्र्य दिनापर्यंत बुजवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (Nationalist Youth congress) केली आहे. अन्यथा वाहनांवरील फास्ट टॅगला (FASTag) काळे स्टिकर लावले जातील, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.आता या आंदोलनापूर्वीच (Agitation)अधिकारी रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनधारकांना आणि नागरिकांना खड्डे मुक्तीचा सुखद धक्का देतात की राष्ट्रवादीला अजून आक्रमक भूमिका घ्यावी लागते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नितीन गडकरी यांना पत्र

खडे लवकरात लवकर बुजवण्यासाठीचे पत्र शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठविले आहे. महामार्गावरील खड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहने अडकून पडतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका वाहनधारकांसह जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना बसत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून दर्जेदार रस्ता करावा, अन्यथा वाहनांवरील फास्ट टॅगवर काळे स्टिकर लावण्यात येईल असा इशारा केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

12 तास वाहतुकीचा खोळंबा

खैरे यांच्या पत्रात या महामार्गावरील त्रासाचा पाढाचा वाचण्यात आला आहे.मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डे झाले आहेत. त्यामुळे अपघात वाढलेत. मुसळधार पावसात घोटी, इगतपुरी आणि कसारा घाटात अनेक अपघात केवळ खड्डय़ांमुळे घडले आहेत. दुसरीकडे कसारा घाटात अपघात झाल्यास दोन दिवस वाहतुकीचा खोळंबा होता. 12-12 तास वाहतूक खोळंबते. वाहनांच्या लांबच लांब रांग लागतात. मुंबई-नाशिक महामार्गावर एकूण तीन टोल नाके आहेत. टोल वसुली होत असतानाही नागरिकांना आणि वाहनधारकांना खड्यांतून मार्ग काढावा लागत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. परंतु कामाचा दर्जा खालावलेला असल्याने. तात्पुरती मलमट्टी केली जात असल्याने दुसऱ्यावर्षी पावसाळ्यात पुन्हा हा महामार्ग खड्यांत जात असल्याचे पत्रात म्हटले आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती खैरे यांनी केली असून 15 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने न बुजवल्यास फास्ट टॅगवर काळे स्टीकर लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.