शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार घेणार येवल्यात सभा, दादा येवल्यात काय बोलणार?

आता पुढच्या आठवड्यात अजित पवार यांची सभा होणार आहे. त्या सभेत थोडं बोलणार. मग तुम्हाला कळेल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार घेणार येवल्यात सभा, दादा येवल्यात काय बोलणार?
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 10:28 PM

नाशिक : शरद पवार यांनी येवल्यात सभा घेतली. आता उत्तर सभा घेऊन प्रत्युत्तर देणार असा इशारा अजित पवार यांनी दिला. आता छगन भुजबळ यांच्या येवल्यात पवारांनी सभा घेतली. त्यानंतर अजित पवार हेसुद्धा पुढच्या आठवड्यात सभा घेणार आहेत. शरद पवार यांनी सभा घेतल्यास आम्हालाही उत्तर सभा घ्यावी लागेल असा इशारा, अजित दादांनी दिला होता. 8 तारखेला शरद पवार यांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवल्यात घेतली. आता पुढच्या आठवड्यात अजित पवार यांची सभा होणार आहे. त्या सभेत थोडं बोलणार. मग तुम्हाला कळेल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

येवल्यात सभा घेऊन शरद पवार यांनी मतदारांची जाहीरपणे माफी मागितली. आपली चूक झाल्याचं म्हटलं होतं. मात्र असेच चुका म्हणजे विकास होईल असा खोचक टोला भुजबळ यांनी लगावलाय.

शरद पवार आता इतरांचे हात वर करतात. पण अजित पवार यांचा हात धरुन ठेवला असता तर ही वेळ आली नसती, अशी टीकाही भुजबळ यांनी पवारांवर केलीय.

येवल्यात सभा घेऊन, शरद पवार यांनी इरादे स्पष्ट केले. तर इकडे संजय राऊत यांनीही येवल्यात शिवसेना छगन भुजबळांचा पराभव करणार असा पुनवृच्चार केलाय.

छगन भुजबळ असो की मग अजित पवार. बंड पुकारुनही आणि निशाणा साधूनही. शरद पवार यांना ते विठ्ठलच म्हणतायत. त्यावरुन संजय राऊत यांनी तुमचे नेमके किती विठ्ठल आहेत ? असा सवाल करत टीकास्त्र सोडलंय.

आमदारांच्या जाहीर बैठकीतून अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल काही गौप्यस्फोट केले. आपल्यालाच कसं वारंवार व्हिलन करण्यात आलं, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता अजित पवार छगन भुजबळ यांच्या येवल्यातून काय बोलतात याकडे नजरा असतील.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.