शैक्षणिक शुल्क माफ करा, अन्यथा 5 जुलैला मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन, AISF विद्यार्थी संघटनेचा इशारा

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशने शैक्षणिक फी वसुली विरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन केलं.

शैक्षणिक शुल्क माफ करा, अन्यथा 5 जुलैला मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन, AISF विद्यार्थी संघटनेचा इशारा
AISF PROTEST
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 10:29 PM

नाशिक : ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशने शैक्षणिक फी वसुली विरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन केलं. कोरोनाचं संकट असतानाही शाळा, महाविद्यालये फी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने पालकांनी करायचं काय ? असा सवाल यावेळी विद्यार्थी तसेच एआयएसएफने केला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. (All India Students Federation staged agitation outside Nashik District Collector Office against collection of fees from student amid Corona pandemic)

शैक्षणिक शुल्क आकारण्याला एआयएसएफ संघटनेचा विरोध

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यात अनेकांचे रोजगार गेले आहेत. यामध्ये मोठ्या हुद्द्याची नोकरी करणाऱ्यांपासून ते मजुरी करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. याच कारणामुळे सध्या पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च कठीण होत चालला आहे. महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय शिक्षण घेणे तर जास्तच अवघड होऊन बसले आहे. असे असले तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क घेतले जात आहे. याचा एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेने विरोध केला आहे.

शैक्षणिक फी माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा

हाताला काम नाही. दोन वेळच्या जेवणाची काही लोकांची भ्रांत आहे. त्यात मुलांचं शिक्षण कसं करायचं ? अवाजवी फी कशी भरायची ? असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच या गंभीर संकटाचा विचार करता राज्य सरकाने त्वरित सरसकट शैक्षणिक फी माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी विद्यार्थी तसेच संघटनेने केली आहे.

…अन्यथा 5 जुलैला मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन

दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशने आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान संघटनेचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने अपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात; अन्यथा येत्या 5 जुलैला मंत्रालयाबाहेर जाऊन ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

इतर बातम्या :

राज्यातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे सौ चुहे खाके… जयंत पाटलांची फडणवीसांवर नाव न घेता टीका

महिला होमगार्डचा विनयभंग, नागपुरात पोलीस निरीक्षकावर गुन्हा

ठाण्यातील झोपडपट्टीत लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन्स फिरवणार, घराजवळच मिळणार कोरोना लस

(All India Students Federation staged agitation outside Nashik District Collector Office against collection of fees from student amid Corona pandemic)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.