AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या एंजलचा भीमपराक्रम; खवळलेल्या समुद्राशी झुंज देत 14 तास 23 मिनिटांत 45.1 किमीची इंग्लिश खाडी पार

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन जलतरण स्पर्धेत नाशिकच्या (Nashik) अवघ्या 18 वर्षांच्या एंजल मोरेने (Angel More) बाजी मारली असून तिने 'वर्ल्ड ट्रिपल क्राऊन' हा मानाचा किताब पटकावला आहे. त्यासाठी तिने सलग 14 तास 23 मिनिटे सोसाट्याचा वारा आणि खवळलेल्या समुद्री लाटांशी झुंज देत इंग्लिश खाडी पार केली.

नाशिकच्या एंजलचा भीमपराक्रम; खवळलेल्या समुद्राशी झुंज देत 14 तास 23 मिनिटांत 45.1 किमीची इंग्लिश खाडी पार
एंजल मोरे
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 10:47 AM

नाशिकः आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन जलतरण स्पर्धेत नाशिकच्या (Nashik) अवघ्या 18 वर्षांच्या एंजल मोरेने (Angel More) बाजी मारली असून तिने ‘वर्ल्ड ट्रिपल क्राऊन’ हा मानाचा किताब पटकावला आहे. त्यासाठी तिने सलग 14 तास 23 मिनिटे सोसाट्याचा वारा आणि खवळलेल्या समुद्री लाटांशी झुंज देत इंग्लिश खाडी पार केली. तिच्या या यशाचे कौतुक होत आहे. (Angel of Nashik wins in International Swimming Championship; Crossing 45.1 km of English gulf in 14 hours and 23 minutes)

आंतरराष्ट्रीय स्तरावरील या वर्ल्ड ट्रिपल क्राऊन मॅरेथॉन जलतरण स्पर्धेत एंजलसह आठ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांना या मोहिमेत अत्यंत अवघड समजला जाणारा इंग्लंड ते फ्रान्स हा समुद्र प्रवास करावा लागणार होता. हे अंतर तब्बल 45.1 किलोमीटर इतके आहे. एंजलसह आठ जलतरणपटू आणि दोन रिले संघ ग्रीनिच येथील वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता मोहिमेवर निघाले. त्यावेळेस सोसाट्याचा वारा सुरू होता. समुद्र खवळला होता. हे अत्यंत भयकारी होते. हे चित्र पाहूनच त्यातील पाच स्पर्धक भीतीमुळे गर्भगळित झाले. त्यांनी या स्पर्धेतून सपशेल माघार घेतली. मात्र, एंजल मागे हटली नाही. तिने हे आव्हान खंबीरपणे पेलले. तिने सलग 14 तास 23 मिनिटे सोसाट्याचा वारा आणि वेगवान समुद्री लाटांशी झुंज देत इंग्लिश खाडी पार केली आणि मानाचा समजला जाणारा ‘वर्ल्ड ट्रिपल क्राऊन’ हा किताब पटकावला.

मॅनहॅटनही केले फत्ते ‘वर्ल्ड ट्रिपल क्राऊन’ हा किताब पटकावण्यासाठी एकूण तीन टप्पे पार करावे लागतात. त्यातील पहिला टप्पा केंटालिना खाडीचा असतो. ही खाडी एंजिलने 14 तास 22 मिनिटांमध्ये पार केली होती. त्यानंतर तिच्यासमोर मॅनहॅटन मोहिमेचे आव्हान होते. ही मोहीम पार केल्यानंतर ‘वर्ल्ड ट्रिपल क्राऊन’ किताबाकडे एक पाऊल पुढे पडते. त्यामुळे तिने 45.9 किलोमीटरचा हा सागरी प्रवास गेल्या महिन्यात 9 तास 1 मिनीट या वेळेत पूर्ण केला. त्यानंतर ती पुढच्या फेरीत पोहचली. या शेवटच्या फेरीत तिने अथक प्रयत्नांती इंग्लीश खाडी खवळलेल्या समुद्रात पार केली आणि यशाला गवसणी घातली. तिच्या या अतिशय थरारक मोहिमेबद्दल कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीमध्ये कौतुक होत आहे. विशेष म्हणजे एंजलला आपण अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये स्पर्धा जिंकल्याचा गर्व आहे.

स्पर्धेचे नियम अत्यंत कठोर एजंलने भाग घेतलेल्या वर्ल्ड ट्रिपल क्राऊन आंतराष्ट्रीय मॅरेथॉन जलतरण स्पर्धेचे नियम अतिशय कठोर आहेत. अंगातील ओले कपडे, कुठलीही स्थिर वस्तू, व्यक्ती, बोट यांना साधा हातही लावला तर स्पर्धकांना बाद ठरवले जाते. त्यामुळे समुद्र खवळलेला असताना, जोरदार लाटा उसळत असताना या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत एंजलने मिळवलेले यश कितीतरी महत्त्वाचे ठरते.

वडील प्रख्यात उद्योजक एंजलचे वडील हेमंत मोरे हे संगणक अभियंता असून ते मूळचे नाशिकचे आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील प्रख्यात उद्योजक म्हणून ते ओळखले जातात. या व्यवसायानिमित्त हेमंत मोर आणि त्यांच्या पत्नी अर्चना मोरे आपल्या मुलांसह सध्या अमेरिकेत असतात. तिथे एंजलनेही यश मिळवल्याने नाशिकमधल्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. (Angel of Nashik wins in International Swimming Championship; Crossing 45.1 km of English gulf in 14 hours and 23 minutes)

इतर बातम्याः

‘शरियत’ सारखा कायदा आणा, मगच बलात्कार थांबतील; नाशिकमध्ये राज ठाकरेंचा सल्ला

छगन भुजबळांनी निधी विकला, माझ्याकडे 500 पुरावे, शिवसेना आमदाराची थेट हायकोर्टात धाव

20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.