जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, सोमय्यांनी आरोप करताना नैतिकता पाळावी, अनिल परब यांचा टोला

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) काल नाशिक जिल्ह्यावर होते. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे.

जेलमध्ये जाऊ हे 'मुंगेरीलाल के हसीन सपने', सोमय्यांनी आरोप करताना नैतिकता पाळावी, अनिल परब यांचा  टोला
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 8:13 AM

नाशिक : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) काल नाशिक जिल्ह्यावर होते. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, असा टोला अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना लगावला. किरीट सोमय्या यांनी आरोप करताना नैतिकता पाळावी, असं देखील अनिल परब म्हणाले. शिवसेना (Shivsena) नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. सध्या किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवलीय. किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत गेले असता तिथं त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली होती. अनिल परब हे नाशिक दौऱ्यावर असताना मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित अपघातातील जखमीवर प्रथमोचार प्रशिक्षण व प्रथमोचार किट वाटप कार्यक्रमासाठी तेमालेगावात आले असतांना माध्यमांशी बोलत होते.

आम्ही जेलमध्ये जाऊ तर ते त्यांचे मुंगेरीलाल के हसीन सपने

आम्ही जेलमध्ये जाऊ हे किरीट सोमय्या यांचे ‘मंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसदर्भात बोलताना अनिल परब यांनी मी संबधित यंत्रणेला उत्तरे देईल, असं म्हटलं. आरोप करताना नौतिकता पाळावी, अशा शब्दात परिवहनमंत्री अनिल परब पोलीस बदली प्रकरणी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला.

शिवसैनिक सोमय्या यांना भेटायला गेले होते

पुण्याच्या महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी शिवसैनिक किरीट सोमय्या यांना भेटण्यासाठी गेले होते. आयुक्तांना जाब विचारायला हवा होता. मात्र, ते पळत सुटले खाली पडले त्यांना कोणीही मारले नाही.

महाविकास आघाडीचं काम चांगलं सुरु

गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीचे काम चांगले सुरू आहे. विरोधकांनी आरोप करणे त्यांचा हक्क आहे.मात्र,आरोप करतांना नैतिकता पाळणे गरजेचा असल्याचा टोलाही परब यांनी लगावला. एसटी कर्मचाऱ्यांना भडकावले जात आहे उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समिती निर्णय मान्य करू असेही परब म्हणाले.

इतर बातम्या:

Video | पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात आले! पवारांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठले आणि…

मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद, राज्यपालांची नजर खाली! नेमकी काय चर्चा?

Anil Parab slam BJP leader Kirit Somaiya and said will gave answer to agency not to Somaiya

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.