NASHIK करांसाठी दिलासादायक बातमी, निर्बंध शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नाशिकमध्ये (nashik) मागच्या दोन दिवसापुर्वी पालक मंत्री छगन भूजबळ यांनी नाशिकमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतली होती. त्यावेळी लवकरचं निर्बधातून मुक्त करू अशी ग्वाही छगन भूजबळ यांनी बैठकीत दिली होती.
नाशिक – मागच्या दोन वर्षात कोरोनाच्या (corona) काळात अनेक निर्बंध महाराष्ट्र (maharashtra) सरकारने लादले होते. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होऊ लागला तसे अनेक जिल्ह्यात निर्बंध कमी करण्यात आले. नाशिकमध्ये (nashik) मागच्या दोन दिवसापुर्वी पालक मंत्री छगन भूजबळ यांनी नाशिकमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतली होती. त्यावेळी लवकरचं निर्बधातून मुक्त करू अशी ग्वाही छगन भूजबळ यांनी बैठकीत दिली होती. त्यानुसार आजपासून निर्बंध शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. बैठकीत भूजबळांनी दिलेल्या सुचनाचे पालन तातडीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिका हद्दीतील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉटेल सिनेमागृह धार्मिक स्थळे स्विमिंग पूल पूर्ण क्षमतेने राहतील.
बैठकीत मोठा निर्णय
नाशिक जिल्ह्यातील कोरोनारुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली असून ती नियंत्रणात आली आहे. तसेच नाशिक शहरी भागातील लसीकरणाचे प्रमाण देखील 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने शहरी भागातील कोरोनाचे निर्बंध उठविण्यात येतील. नाशिकमध्ये विवाह सोहळ्यापासून ते राजकीय कार्यक्रमांनाही आता अवघी पन्नास टक्के नव्हे, तर चक्क शंभर टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, गणेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी
महापालिका हद्दीतील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉटेल सिनेमागृह धार्मिक स्थळे स्विमिंग पूल पूर्ण क्षमतेने चालू होणार असल्याने नाशिककरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून अनेक ठिकाणचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.