Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special | दोन वेळा आमदार, समाजकारणात रस, टेनिसवर प्रेम; पंकज भुजबळांचा प्रवास!

पंकज भुजबळ पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांना निवडणुकीचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून केलेले काम आणि वडील छगन भुजबळ यांचा सहवास यातून ते बरेच काही शिकले. या बळावर त्यांनी दोन वेळा आमदारकी पटकावली. मनाने पक्के राजकारणी असलेल्या पकंज यांना वाचनाची आवड आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त...

Birthday Special | दोन वेळा आमदार, समाजकारणात रस, टेनिसवर प्रेम; पंकज भुजबळांचा प्रवास!
पंकज भुजबळ.
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:21 AM

नाशिकः नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे संचालक आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे चिरंजीव पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांचा 19 मार्च रोजी वाढदिवस. नांदगाव तसा दुष्काळी भाग आणि मतदार संघ. या ठिकाणाहून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकिटावर दोनवेळा विधानसभेवर गेले. येथे पाणीप्रश्नावर काम केले. लघुपाटबंधारे, रस्ते, मनमाड पाणीप्रश्नी योजना तयार करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र, 2019 मध्ये त्यांना शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांची हॅट्रीक होता-होता राहिली. या पराभवानंतरही पंकज भुजबळ यांचे काम जोरात सुरूय. राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध कार्यक्रम, आंदोलन आणि सतत लोकांच्या भेटीगाठीवर त्यांचा भर असतो. या वर्षी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात जो वाद झाला, त्या वादालही नांदगाव मतदार संघाची किनार होती. कारण आता महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आहेत. त्यावरून हा वाद विकोपाला गेलेला पाहायला मिळाला.

चांद्यापासून बांद्यापर्यंत…

पंकज भुजबळ हे उच्च विद्याविभूषित आहेत. खरे तर राजकारण ही त्यांची आवड, व्यवसाय म्हणाल तर शेती आणि शिक्षण अभियांत्रिकीतून पदव्युत्तरपर्यंत पूर्ण केलेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षामध्ये कार्यकरत आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदे सांभाळलीयत. युवा कार्यकारिणीवर ते होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही काही काळ त्यांच्याकडे होती. मुंबई एज्युकेशन ट्रस्टवर ते आहेत. ग्रामीण विकास, महिला सबलीकरण, व्यवसाय प्रशिक्षण आदी कामांमध्ये त्यांची रुची आहे. नाशिक जिल्ह्यात त्यांनी असे अनेक उपक्रम राबवले आहेत.

सामाजिक उपक्रम, संस्थांवर काम…

पकंज भुजबळ यांनी अनेक संस्थेवर काम पाहिले आहे. त्यात श्री सिध्दीगणेश संस्था, भायखळा भाजीपाला मार्केट प्रिमायसेस सोसायटी, माझगाव सेवा सहकारी संस्था, शिवडी सेवा सहकारी संस्था यांचा समावेश आहे. या संस्थांचे ते सल्लागार आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठीही आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात विद्यार्थी सेवा संघ, एसएससी सराव परीक्षा व विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम आदींचा समावेश आहे. त्यांनी माझगाव मुंबई विभागात आरोग्य व नेत्रज्ञान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यांचे इतरही सामाजिक उपक्रम सुरू असतात.

संगीत, क्रिकेट, टेनिस…

पंकज भुजबळ पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांना निवडणुकीचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून केलेले काम आणि वडील छगन भुजबळ यांचा सहवास यातून ते बरेच काही शिकले. या बळावर त्यांनी दोन वेळा आमदारकी पटकावली. अनेक वादग्रस्त प्रकरणांतही त्यांचे नाव गोवले गेले. मात्र, पुढे त्यातून सहीसलामत सुटका झाली. मनाने पक्के राजकारणी असलेल्या पकंज यांना वाचनाची आवड आहे. तर संगीत, क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिसचे ते चाहते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त टीव्ही 9 परिवारातर्फे त्यांना खूप-खूप शुभेच्छा.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.