नाशिक विभागातील पोलीस ठाण्यांतही सीसीटीव्ही; तक्रारीही मागवल्या, प्रकरण काय?

सर्वोच्च न्यायालयाने सर्व पोलिस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर पर्यवेक्षण समित्या स्थापन करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार नाशिक (Nashik) विभागात जिल्हानिहाय पर्यवेक्षन समित्या स्थापन करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

नाशिक विभागातील पोलीस ठाण्यांतही सीसीटीव्ही; तक्रारीही मागवल्या, प्रकरण काय?
नाशिक विभागातील पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 7:06 AM

नाशिकः पोलीस (Police) ठाण्यांमध्ये छळ होतो, अनेकदा कठोर शासन केले जाते, असे आरोप व्हायचे. आता असे झाले तरी, ते कॅमेऱ्यात कैद होणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्रमांक 3543/2020 नुसार सर्व पोलिस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर पर्यवेक्षण समित्या स्थापन करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार नाशिक (Nashik) विभागात जिल्हानिहाय पर्यवेक्षन समित्या स्थापन करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार आता नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामधील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी जिल्हानिहाय पर्यवेक्षन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

समित्यांची जबाबदारी काय?

विभागीय आयुक्तांनी स्थापन केलेल्या समित्यांची जबाबदारी ही सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासोबतची उपकरणे यांच्या देखभालीबाबत वेळोवेळी पाहणी करणे, पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी यांना सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीत कार्यरत ठेवण्याबाबत व देखभालीबाबत सूचना देणे, सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासोबतच्या उपकरणे सुरू असल्याबाबत राज्यस्तरीय पर्यवेक्षण समितीला मासिक अहवाल सादर करणे, मानवी हक्कांचे उल्लंघन झालेल्या तथापि नोंद न झालेल्या प्रकरणाबाबत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची असणार आहे.

तक्रारीही मागवल्या

समित्यांमधील सदस्य असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दरमहा न चुकता मासिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहणार आहे. या समित्यांमधील सदस्य असलेले लोकप्रतिनिधी बदलल्यास अथवा कालावधी समाप्त झाल्यास नवनियुक्त महापौर अथवा जिल्हा परिषद अध्यक्षांची नावे संबंधित महानगर पालिका अथवा जिल्हा परिषद कार्यालयाने कळविणे क्रम प्राप्त असणार आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही बाबतच्या काही तक्रारी divcom.nashik@maharashatra.gov.in या ई मेल पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्तांनी स्थापन केलेल्या समित्या…

नाशिक जिल्हा

1) नाशिक शहर: विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक – अध्यक्ष , जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नाशिक – सदस्य, सतीश कुलकर्णी, महापौर नाशिक, मनपा – सदस्य, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण – सदस्य.

2) नाशिक(ग्रामीण): विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक – अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नाशिक – सदस्य, बाळासाहेब क्षीरसागर, जि. प. अध्यक्ष, नाशिक -सदस्य, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, नाशिक – सदस्य.

3) मालेगाव शहर: विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नाशिक-सदस्य, ताहेरा शेख रशीद, महापौर, मालेगाव, मनपा – सदस्य, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण – सदस्य.

अहमदनगर जिल्हा

1) अहमदनगर शहरः विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, अहमदनगर – सदस्य, रोहिणी संजय शेंडगे, महापौर अहमदनगर, मनपा -सदस्य पोलीस अधीक्षक,अहमदनगर – सदस्य.

2) अहमदनगर ग्रामीणः विभागीय आयुक्त, नाशिक विभाग नाशिक अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, अहमदनगर – सदस्य, राजश्री चंद्रशेखर घुले – पाटील, जि. प. अध्यक्ष अहमदनगर -सदस्य, पोलीस अधीक्षक, अहमदनगर – सदस्य.

जळगाव जिल्हा

1) जळगाव शहर: विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक – अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जळगाव – सदस्य, जयश्री सुनील महाजन, महापौर जळगाव, मनपा – सदस्य, पोलीस अधीक्षक, जळगाव – सदस्य.

2) जळगाव ग्रामीण: विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जळगाव – सदस्य, रंजना प्रल्हाद पाटील, जि. प. अध्यक्ष जळगाव – सदस्य, पोलीस अधीक्षक, जळगाव – सदस्य.

धुळे जिल्हा

1) धुळे शहर: विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक – अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, धुळे – सदस्य, प्रदीप बाळासाहेब कर्पे, महापौर धुळे, मनपा – सदस्य, पोलीस अधीक्षक, धुळे – सदस्य.

2) धुळे ग्रामीण: विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक – अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, धुळे – सदस्य, तुषार विश्वासराव रंधे, जि. प. अध्यक्ष धुळे – सदस्य, पोलीस अधीक्षक, धुळे – सदस्य.

नंदुरबार जिल्हा

विभागीय आयुक्त,नाशिक विभाग,नाशिक-अध्यक्ष,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी , नंदुरबार  – सदस्य, ॲड. सीमा वळवी जि. प. अध्यक्ष नंदुरबार – सदस्य, पोलीस अधीक्षक, नंदुरबार – सदस्य.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.