पुन्हा पाऊस ओला ओला: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्रामध्ये (North Maharashtra) शनिवारपासून (18 सप्टेंबर) पुढचे चार दिवस पुन्हा एकदा पावसाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुन्हा पाऊस ओला ओला: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
पावसाची पुन्हा हजेरी.
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 3:55 PM

नाशिकः नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्रामध्ये (North Maharashtra) शनिवारपासून (18 सप्टेंबर) पुढचे चार दिवस पुन्हा एकदा पावसाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Chance of rain in North Maharashtra including Nashik, Meteorological Department forecast)

गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकला पावसाने झोडपून काढले आहे. गंगापूर, दारणासह जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरत आली आहेत. गोदावरी नदीला पहिला पूर येऊन गेला. नांदगाव आणि मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. शनिवारी (18 सप्टेंबर) आणि रविवारी (19 सप्टेंबर) हलक्या ते मध्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी (20 सप्टेंबर) उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ, विजांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवार (21 सप्टेंबर) आणि बुधवारी (22 सप्टेंबर) विभागातील अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ, वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल. या काळात धुके असण्याचीही शक्यता आहे.

ही धरणे काठोकाठ भरली

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.

जळगावलाही दिलासा

जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचा साठा हा 60.84 वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे.

मुंबईचा पाणीप्रश्न मिटला

मुंबईकला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे. (Chance of rain in North Maharashtra including Nashik, Meteorological Department forecast)

इतर बातम्याः

शिक्षण विभागाची करामतः परीक्षा फॉर्म भरला गणिताचा अन् गुण मिळाले जीवशास्त्राचे, नाशिकमधला प्रकार

मोठी बातमीः देशातील सर्वात रूंद बोगदे ऐतिहासिक वेळेत पूर्ण; कसारा घाट फक्त 5 मिनिटांत पार, मुंबई आणखी जवळ

पुढच्या वर्षी लवकर याः नाशिककरांना येथे करता येईल बाप्पांचे विसर्जन!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.