ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय; पण घाबरून चालणार नाही: छगन भुजबळ

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोतय. यापुढेही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र या अडचणींना न घाबरता आपल्याला पुढे जायचे आहे. (chhagan bhujbal)

ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय; पण घाबरून चालणार नाही: छगन भुजबळ
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 11:46 AM

धुळे: ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोतय. यापुढेही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र या अडचणींना न घाबरता आपल्याला पुढे जायचे आहे. हा लढा निकराने लढायचा आहे, असं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. (Chhagan Bhujbal appeal people to come forward to fight for OBC reservation)

धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक,किरण पाटील, राजेश बागुल, सतीश महाले, बापू महाजन,रणजित राजेभोसले,नेरकर, सतीश बाविस्कर, राजेंद्र चौधरी, राजेंद्र वाघ, गोपाळ देवरे,भगवान करनकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हा ओबीसींच्या संक्रमणाचा काळ

सध्याचा काळ हा ओबीसींच्या संक्रमणाचा, परीक्षा घेणारा काळ आहे. मात्र आपल्याला त्यावर मात करत पुढे जावे लागणार आहे. सामाजिक न्यायासाठी संघटनेची आवश्यकता होती. त्या आधारावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करण्यात आली. गोरगरिबांचं दुःख कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना संघटनेच्या माध्यमातून काम करायचं आहे. ओबीसींची लढाई ज्यांनी ज्यांनी हाती घेतली त्यांना त्रास देण्याचे काम केलं. देशात अजूनही मनुवादी प्रवृत्ती जिवंत आहे. त्यामुळे त्रास हा होणारच आहे. त्यामुळे घाबरून चालणार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

फुले, शाहू, आंबेडकर हीच आपली दैवत

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महापुरुष आपली दैवत आहे. महात्मा जोतीराव फुले सावित्रीबाई फुले यांनी महिलांना समाजात महत्वाचे स्थान उपलब्ध करून दिले. प्रगत शेती आणि शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची कल्पना त्यांनी त्या काळात मांडली. जाती व्यवस्था नष्ट करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. महात्मा फुले यांनी शिक्षण द्या आणि कामं वाटून घ्या जातीच्या प्रमाणे असे सांगितले हेच आरक्षण आहे, असे ते म्हणाले.

महात्मा फुलेंचे साहित्य भेट म्हणून द्या

ओबीसी समाज का मागे राहिला? यासाठी इतिहासाची पान वाचने गरजेची आहे. त्यासाठी महात्मा फुले यांचे साहित्य वाचावे. हे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी त्यांचे साहित्य भेट वस्तू म्हणून द्या, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपण या महापुरुषांचे वारसदार आहोत. पण वारसदार म्हणून घेण्याचा हक्क तेव्हा प्राप्त होईल जेव्हा आपण त्यांच्या विचारांवर पावलं टाकू तेव्हाच आपण वारसदार होऊ शकू, असे त्यांनी यावेळी सांगितले.महाविकास आघाडी सरकार हे फुले शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांवर काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Chhagan Bhujbal appeal people to come forward to fight for OBC reservation)

संबंधित बातम्या:

बाळासाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री कसा हवा होता?; संजय राऊतांनी सांगितला किस्सा!

‘त्या’ पत्रामुळे चंद्रकांतदादांचेच धोतर सुटले, महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा! किती मनोरंजन कराल?; राऊतांची शेरेबाजी सुरूच

Audio Clip : पुण्यातील भाजप आमदाराचा प्रताप, महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, भाजप कारवाई करणार का?

(Chhagan Bhujbal appeal people to come forward to fight for OBC reservation)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.