चर्चा तर होणारचः मंत्री भुजबळांचा नायक 2; स्वस्त धान्य दुकानावर धडक भेट देत झाडाझडती, काय घडले बघाच…!

मंत्री छगन भुजबळांनी मुळशी दौऱ्यात आपली गाडी अचानकपणे चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानाकडे वळवायला लावली. यावेळी त्यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्डसह इतर सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. भुजबळांच्या या धावत्या भेटीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली.

चर्चा तर होणारचः मंत्री भुजबळांचा नायक 2; स्वस्त धान्य दुकानावर धडक भेट देत झाडाझडती, काय घडले बघाच...!
मंत्री छगन भुजबळांनी मुळशी तालुक्यातील चाले गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट देत पाहणी केली.
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 4:28 PM

नाशिकः तुम्ही अनिल कपूरचा (Anil Kapoor) नायक सिनेमा पाहिला असेलच. या चित्रपटातील मुख्य भूमिका करणारा नायक अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो. अन् तो अचानक एका स्वस्त धान्य दुकानावर धडक देत पाहणी करतो. असाच काहीसा प्रकार रविवारी पुणे जिल्ह्यात घडला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज मुळशी येथील दौऱ्यावर असताना त्यांनी येथील चाले या गावातील परवानाधारक धनजंय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. यावेळी शासनाने आयएसओ (ISO) नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत पाहणी केली. भुजबळांच्या या डायरेक्ट भेटीने दुकानदाराचे धाबे दणाणले. मंत्री महोदयांचा ताफा दुकानासमोर थांबल्याने परिसरातील गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.

त्याचे झाले असे की…

मंत्री छगन भुजबळांनी मुळशी दौऱ्यात आपली गाडी अचानकपणे चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानाकडे वळवायला लावली. यावेळी त्यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजिट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली.

प्रामाणिकपणाचे केले कौतुक

मंत्री भुजबळ यांना या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता करण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी या रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना करत रेशन दुकानदार प्रामाणिकपणे सेवा करत असल्याबद्दल कौतुक केले. आपले काम सुरू ठेवावे, अशा सूचना दुकानदारास त्यांनी केल्या. भुजबळांच्या या धावत्या भेटीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली.

वारकऱ्यांचे केले अभिष्टचिंतन

भुजबळांनी मुळशी तालुक्यातील वारकरी संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. वारकरी संप्रदाय समाज तालुका मुळशी या संस्थेचा हिरकमहोत्सव व ज्येष्ठ वारकऱ्यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मूळ बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार – प्रचार अधिक व्यापक स्वरूपात केला. आपल्या ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ, अभंग, विरहीन्या इत्यादी चिंतनशील रचनांमधून व प्रत्यक्ष आचरणातून त्यांना लोकांच्या मनात विवेकाची ज्योत जागृत केली. पसायदानाच्या रूपाने दया, क्षमा, करुणा, प्रेम आणि समतेचा संदेश त्यांनी महाराष्ट्रातील घराघरांत पोचवला. भारतीय परंपरेतील विविध विचारधारा, जाती, वर्ण, पंथ आणि सांप्रदाय एकत्रित आणून “हे विश्वची माझे घर’ हा नवा वैश्विक विचार जगापुढे मांडला. धर्माच्या आणि प्रांतांच्याही सीमा या विचारांनी मोडून काढल्याचे ते म्हणाले.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.