ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

कुणावर तरी आरोप, कुणाला तरी नोटिसा असं सुरु असतंय. ईडी म्हटलं की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं, ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल, असं अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 3:43 PM

नाशिक: कुणावर तरी आरोप, कुणाला तरी नोटिसा असं सुरु असतंय. ईडी (ED) म्हटलं की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं, ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल, असं अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिकमध्ये जे काम व्हायला हवं होतं ते झालेलं नाही, असं देखील भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal slams opposition leaders over ed action on NCP leaders)

स्मार्ट सिटीसाठी हवा तेवढा विकास झाला नाही

नाशिक शहराचा स्मार्ट सिटीमुळं बोजवारा उडाला असल्याबद्दल विचारलं असता, त्या विषयात अजून लक्ष घातलेलं नाही. मात्र, एकदा पाहायला गेलो होतो. मात्र, स्मार्ट सिटी योजनेमध्ये नाशिकमध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तितकं काम झालेलं नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

बससेवा फायद्यात नाही

नाशिक शहरातील महापालिकेच्या स्मार्ट बससेवेला विरोध होता आणि आहे. जगातील कुठलिही बससेवा फायद्यात नाही. मुंबईची बेस्ट सेवा त्याला अपवाद आहे. कारण, बेस्टला वीज पुरवठ्यातून होणारा फायदा बससेवेत घातला जात होता. मात्र, इतर कुठेही बससेवा फायद्यात नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. नाशिक महापालिकेला हा खर्च परवडणार आहे का हे पाहावं लागेल, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं

स्मार्ट सिटीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी

नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल आणि लोक प्रतिनिधी आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांनी प्रकाश थविल यांची बदली करावी अशी मागणी केली होती. राज्याचे सचिव सीतारम कुंटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे. आता सुमंत मोरे नाशिक स्मार्ट सिटीचे नवीन सीईओ असतील. नगरसेवकांच्या रेट्या पुढे स्मार्ट सिटी प्रशासन झुकलं आहे.

संबंधित बातम्या:

राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार, तिन्ही पक्षांची हिच भूमिका: नवाब मलिक

जून महिना संपला तरी पाऊस नाही, पपईवर रोगांचा प्रादुर्भाव, 6 एकर बागेवर शेतकऱ्याचा कोयता

(Chhagan Bhujbal slams opposition leaders over ed action on NCP leaders)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.