नाशिक पोलिसांचा हाबाडा; 6 नगरसेवकांवर गुन्हा, गर्दी जमवणे पडले महागात

नाशिकमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 6 नगरसेवकांना दणका देत त्यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात सोमवारी (27 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक पोलिसांचा हाबाडा; 6 नगरसेवकांवर गुन्हा, गर्दी जमवणे पडले महागात
नाशिक महापालिका.
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 5:24 PM

नाशिकः नाशिकमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 6 नगरसेवकांना दणका देत त्यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात सोमवारी (27 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनाई आदेश झुगारून गर्दी जमवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यात शिवसेनेच्या पाच तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. (Crime filed against 6 corporators in Nashik)

नाशिकमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यानी लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना नुकत्याच केल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. मात्र, दुसरीकडे नगरसेवकच गर्दी होणारे कार्यक्रम घेताना दिसत आहेत. हे टाळण्यासाठी अखेर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गतच गर्दी जमवून विकासकामांचे उद्घाटन केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिवसेनेचे दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, भागवत आरोटे, मधुकर जाधव आणि भाजपच्या प्रतिभा पवार यांचा समावेश आहे. या नगरसेवकांनी गर्दी जमवून विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

जिल्ह्यात हजार कोरोना रुग्ण

जिल्हा सामान्य रुग्णालयाने आज दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 6 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १४ ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्यातील 3 लाख 98 हजार 448 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

सध्या नाशिकमध्ये 39, बागलाण 21, चांदवड 32, देवळा 30, दिंडोरी 26, इगतपुरी 06, कळवण 08, मालेगाव 10, नांदगाव 11, निफाड 184, पेठ 01, सिन्नर 250, त्र्यंबकेश्वर 07, येवला 80 असे एकूण 705 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महापालिका क्षेत्रात 271, मालेगाव महापालिका क्षेत्रात 19 तर जिल्ह्याबाहेरील 11 रुग्ण आहेत.

नियमांचे पालन नाही

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांकडे पाठ फिरवली आहे. जुन्या नाशिकमधील पंचवटी, रामकुंड परिसरात बाजार असो, की इतर ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. शालिमार, अशोकस्तंभ, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह संपूर्ण शहरातही हीच परिस्थिती आहे. विशेषतः अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. (Crime filed against 6 corporators in Nashik)

इतर बातम्याः

पर्यटन दिन विशेषः प्रभू रामचंद्र वनवासात कुठल्या कुंडात स्नान करत, नाशिकला पश्चिम भारताची काशी का म्हणतात?

बहुचर्चित कथित धर्मांतरणासाठी परदेशातून फंडिंग; नाशिकच्या तरुणाच्या खात्यात तब्बल 20 कोटी जमा

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.