Video : ‘लग्ना्च्यावेळी घोड्यावर बसवलं नाही आणि आता रथात बसवलं’; अजित पवारांची दमदार टोलेबाजी
राज्यातील अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार मध्ये सहभागी झाल्यानंतर काय कामे हे अजित पवारांनी सांगितली. नाशिकमध्ये अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये घोडा नसल्याचा किस्सा का सांगितला जाणून घ्या.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. नाशिकमध्ये अजित पवारांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये कामगार मेळाव्यामध्ये अजित पवारांनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये लाडकी बहिण योजनेवर टीका करणऱ्यांना उत्तर दिलं. त्यासोबतच दादांना रथात बसवल्यावर त्यांनी आपल्या भाषणात याबद्दल बोलताना टोलेबाजी केली.
मी इथे आलो, लग्नात रथ असतोल ना नव वधू आणि वराला ज्याप्रमाणे रथात बसवतात तसं आज मला बसवलं होतं. त्यावेळी मनात म्हटलं की ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी घोड्यावर बसवलं नाही, रथतर बाजूलाच राहिला, आता माणिकराव रथात बसवत आहेत. काय करणार आमचं त्यावेळी राहून गेलं होते ते आज पूर्ण करून घेतलं. आमच्याबरोबर सुनीट तटकरे,सुरज चव्हाण आणि अनिल भाईदास पाटील यांनीही हे पूर्ण करून घेतल्याचं अजितव पवार मिश्किलपणे म्हणाले.
जनसन्मान यात्रेचं शेतकरी, नागरिक आणि विशेषत: माझ्या भगिनी आणि माय माऊली मोठ्या उत्साहाने स्वागत करत आहेत. सकाळपासूनमाझ्या हातात किती राख्या बांधल्या हे पाहू शकता असं म्हणत अजित पवारांनी सर्वांना हात उंचावत दाखवलं. मला या तीन ते चार दिवसात मला कळायला लागल्यापासून माझ्या बहिणींनी जेवढ्या राख्या बांधल्या असतील तेवढ्या राख्या मला तीन दिवसात बांधल्या. एवढं प्रेम माझ्या मायमाऊली दाखवत आहेत. आम्ही कुठेतरी त्यांचा विश्वास हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या विश्वासाला काही झालं तरी आम्ही तडा जाऊ देणार नाही. विरोधकांना वाटेल ते आरोप करू देत. आम्ही सगळं जे करतो ते फार प्लॅनिंगने करतो. आर्थिक शिस्त आम्हालाही कळते, दहा-दहा वर्षे राज्याच्या अर्थसंकल्प सादर करणं हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही. उगीचंच कोणाला काही पद भूषवायला नाही मिळाली. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार त्यांना आहे पण खोटं का सांगता? त्यासंदर्भात माहिती का घेत नाही, असं माझं त्यांना सांगणं आहे असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
आचारसंहिता लागू होण्या पूर्वी दमण गंगा पिंजाळ प्रकल्पाना मंजुरी देण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील गुंतवणूकचा वेग वाढला आहे. जर्मनी, जपान आणि फ्रान्स मध्ये रोजगाराच्या संधी आहेत. सिन्नर, नाशिकमधे नोकरी मिळेल असे नाही, बाहेर जाण्याची तयारी ठेवा. बारामतीमध्ये अनेक इंडस्ट्री आहेत, उद्योगपती आणि कामगार यांच्यात समनव्यासाधण्याचा प्रयत्न करतो. जसे आजपर्यंत साथ दिली तसेच पूढे चांगले काम करण्यासाठी तुमची साथ द्या, असं अजित पवार म्हणाले.