भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त भाजपवर, हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं

आज नाशिकमध्ये फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिवसेनाला पुन्हा हिंदुत्वावरून डिवचलं आहे. नाशिक महानगरपालिकवर भगवा फडकवा असे आवाहन करतना भगव्याची जबाबदारी आता फक्त भाजपवर आहे. बाकीचे काय करत आहेत हे तुम्ही पाहत आहात, असे म्हणत शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.

भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त भाजपवर, हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं
फडणवीसांनी हिंदुत्वावरून पुन्हा डिवचलं
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 4:38 PM

मुंबई : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने (Shivsena) जेव्हापासून घरोबा सुरू केलाय. तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यारून हिणवताना दिसून येत आहे. शिवसेनेचे हिंदूत्व आता पहिल्यासारखे राहिले नाही, शिवसेनेचे हिंदूत्व आता बेगडी हिंदूत्व झालं आहे, अशी टीका सतत भाजपकडून करण्यात येत आहे. आज नाशिकमध्ये फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिवसेनाला पुन्हा हिंदुत्वावरून डिवचलं आहे. नाशिक महानगरपालिकवर भगवा फडकवा असे आवाहन करतना भगव्याची जबाबदारी आता फक्त भाजपवर आहे. बाकीचे काय करत आहेत हे तुम्ही पाहत आहात, असे म्हणत शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. आज देवेंद्र फडणवीस औरंगाबाद आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी चंग बांधला आहे. फडणवीसही कार्यकर्त्यांना बुस्टर देण्याचे काम करत आहे.

महापौरांनी भाजपला फटकारलं

सकाळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिंदुत्वावरून भाजपला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्वाची खपली पुन्हा उकरली आहे. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं. हिंदुत्व हे मानणारं हिंदुत्व आहे. देश आणि मुंबईला अस्थिर करणारं हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे स्थिर आहे. प्रत्येक धर्माचा आदर करावा हे आपल्याला आपल्या आईवडील आणि गुरुजणांनी शिकवलं आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सुनावले आहे. त्यानंतर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे

नाशिकवर पुन्हा भगवा फडकवा

याच मुद्द्यावरून पुढे बोलताना, फडणवीसांनी ठाकरे सरकारचा दलाली खाणारे सरकार असा उल्लेख करत टीका केली आहे. काही जणांना राज्य फक्त दलाली खाण्यासाठी पाहिजे असतं, मात्र आम्ही नाशिकचा विकास केला म्हणून आज शहराची परिस्थिती सुधारली आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला आहे. कोरोनात राज्याने एक नव्या पैशाची मदत केली नाही. शेवटी मी आलो आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळालं. सरकारच अस्तित्व नाही. राज्य मुंबईच्या बाहेर देखील असत हे याना माहीतच नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकतीने उतरावं लागेल. हे तिघे काहीही बोलले तरी आपल्याला तिघांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र यावं लागेल, असे आवाहन फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटलांचा इशारा

नको त्या विषयावर पोपटपंची आणि दलाली खाणे हाच सरकारचा धंदा, फडणवीसांचा घणाघात

ज्या भाजपच्या आमदाराकडून आदित्य ठाकरेंवर टीका, त्यांच्याच हस्ते शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला हारतुरे; कल्याणमध्ये चाललंय काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.