रावणाचे दहन करू नका, पूजन करा नाहीतर…आदिवासी संघटनेची मोठी मागणी…
सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमोलवर यांना आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी विकास संघटनांनी निवेदन देत रावण दहनाला विरोध दर्शविला आहे.
नाशिक : शेकडो वर्षांपासून गल्ली पासून दिल्ली पर्यन्त विजया दशमी दसऱ्याला (Ravana) रावण दहन करण्याची परंपरा आहे. विविध राज्यांमध्ये शेकडो फुटांचे रावण साकारून रावण दहन करण्याची परंपरा आहे. याच रावण दहणाच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. नवरात्र उत्सवात (Navratr Festival) नऊ दिवस उत्साहाचे वातावरण असते, त्यांतर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करून नागरिक दहा दिवस नवरात्र उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. पण याच काळात केले जाणारे रावण दहन यावर आदिवासी संघटनांनी (Tribel Union) आक्षेप नोंदवत रावण दहन करण्यास विरोध दर्शविला आहे. रावणाचे दहन न करता पूजन करावे अशी अजब मागणी आदिवासी संघटनेने केल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे रावण दहन केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमोलवर यांना आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी विकास संघटनांनी निवेदन देत रावण दहनाला विरोध दर्शविला आहे.
रावण हा राजा होता, त्याची विविध ठिकाणे मंदिरे असून ठिकठिकाणी पूजा होत असते, शिवाय आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे. त्याला जाळण्याची परंपरा बंद करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
यापूर्वी देखील आदिवासी संघटनांनी रावण दहनाला विरोध दर्शविला होता. आणि निवेदन देत रावण दहन केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे.
आदिवासी संघटनेने पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे त्यात रावणाला देव मानत रावण हा विविध गुणांचा समुच्चय असल्याचे म्हंटले आहे.
रावण हा उत्कृष्ट संगीतज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, राजनीति, आयुर्वेदाचार्य यांसह विवेकवादी होता म्हणून त्याचे दहन करून त्याचा गुणांचा अपमान होत असल्याचे नमूद केले आहे.
त्यामुळे रावणाचे दहन न करता त्याचे पूजन करावे, रावण दहनाची प्रथा बंद करावी अन्यथा कुणी रावण दहन केलेच तर त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.