आदिशक्तीचा जागर साधेपणाने; नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया नाही!
नाशिक जिल्ह्यात यंदाही नवरात्रोत्सवात साधेपणानेच साजरा करा. या काळात गरबा आणि रास दांडियाचे आयोजन करू नका, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात यंदाही नवरात्रोत्सवात साधेपणानेच साजरा करा. या काळात गरबा आणि रास दांडियाचे आयोजन करू नका, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट अजून कायम आहे. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवरात्रोत्सव मंडळांनासाठी लागू केलेली नियमावली जिल्ह्यातही जशीच्या तशी लागू केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमही मोजक्या लोकांच्या उपस्थित साजरा करावा. फेसबूकसारख्या सोशल मीडियावरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. त्यासाठी महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी. सार्वजनिक मंडळांनी देवीची मूर्ती चार फूट तर घरगुती दोन फूट उंचीची असावी. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी यंदाही रक्तदान शिबिरे आणि आरोग्य शिबिरे आयोजित करून मलेरिया, डेंग्यू, कोरोना आजारांबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
वणीचे मंदिर 24 तास खुले
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. नवरात्रच्या काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरविण्यास बंदी असेल आणि गडावर खासगी वाहनांनाही परवानगी आहे. नांदुरीवरून जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे.
असे आहेत नियम
नवरात्रोत्सवाच्या काळात तसेच कोजागरी पौर्णिमेलाही 18 आणि 19 ऑक्टोबरला खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये पन्नास टक्के प्रवासी बसवून वाहतूक सुरू राहील. नांदुरी येथील बुथवरून ऑनलाइन पास शक्य असेल तरच मिळेल. पायी दर्शन करण्यासाठी बारा ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडच्या नियमानुसार या काळात फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहणार आहे. त्यात फेनिक्यूलरमधील भाविकांना 30 टक्के तर पायरीचे दर्शन घेणाऱ्यांना भाविकांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.
इतर बातम्याः
आमच्याकडे टोल नाक्यांवर तर काय-काय चालतं; भुजबळांची शिवसेना आमदार कांदेंवर शेलकी टीका
भारतीय युजर्ससाठी Windows 11 रोलआऊट, तुमच्या PC वर सिस्टिम कशी इन्स्टॉल करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप#Windows10 #WindowsUpdate #Microsoft https://t.co/thP0F8ANHX
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2021