Eid al-Fitr : मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांना आता रमजान ईदचे वेध, पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्हीची राहणार नजर

समाज विघातक कृत्य करणाऱ्या 94 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर राज्य राखीव व दंगा नियंत्रण पथकाच्या प्रत्येकी दोन तुकड्या तसेच बाहेरून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

Eid al-Fitr : मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांना आता रमजान ईदचे वेध, पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्हीची राहणार नजर
सीसीटीव्हीची राहणार नजरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 1:12 PM

मालेगाव – मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद (Eid) सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल मालेगाव शहरात प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून मुस्लिम बांधवांना आता रमजान ईदचे वेध लागले आहे. रमजान ईदची सामुदायिक नमाज (Namaz) पठणासाठी मालेगावच्या ईदगाह मैदानावर लाखो मुस्लिम बांधव नमाज एकत्र जमतात. गेली दोन वर्षे कोरोनाच्या (Corona) निर्बंधामुळे सामुदायिक नमाज पठण होऊ शकले नाही. यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्याने मुस्लिम बांधवामध्ये मोठा उत्साह असून,सर्वांना रमजान ईदचे वेध लागले आहेत.

नमाजसाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

लाखो मुस्लिम बांधव सामुदायिक नमाज पठणासाठी एकत्र येणार आहेत. प्रशासनाच्य वतीने सामुदायीक नमाज पठणाला परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाच्यावतीने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. महसूल, महापालिका व पोलिस प्रशासनाने तयारीची संयुक्त पाहणी केली आहे. महापालिका प्रशासानाकडून इदगाह मैदानाची स्वच्छता करण्यात आली. तर नमाजसाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रमजान काळात कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे.

सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार

समाज विघातक कृत्य करणाऱ्या 94 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर राज्य राखीव व दंगा नियंत्रण पथकाच्या प्रत्येकी दोन तुकड्या तसेच बाहेरून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. 1 हजार कर्मचारी व 60 अधिकारी तैनात करण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. सोशल मिडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सकाळी साडे आठ वाजता मुख्य इदगाह मैदानावर नमाज पठण केले जाणार असून नागरिकांनी शांततेत व उत्साहात रमजान ईद साजरी करावी असे आवाहन मुस्लिम धर्मगुरू व पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी सांगितली.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.