AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी; विभागीय आयुक्तांच्या सूचना

शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.

शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी; विभागीय आयुक्तांच्या सूचना
राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 6:55 PM

नाशिकः शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वत: पीक पेरणीची माहिती स्वतः ऑनलाईन करण्यासाठी ई – पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ 13 ऑगस्ट 2021 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यास शेतकऱ्यांनी शासनाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थक करून दाखविला आहे. त्यामुळे या ई-पीक पहाणी प्रकल्पाचे कामकाज 100 टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी. त्यात काही अडचणी आल्यास आपल्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

क्षेत्रीय स्तरावरून वास्तविक वेळेत पिकांची माहिती संकलित करणे, तसेच सदर माहिती संकलित करतांना पारदर्शकता आणणे, पीक पहाणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सदर माहिती वापरणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई- पीक पहाणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. ठिबक, तुषार सिंचन योजना, आधारभूत किमतीवर धान, कापूस, हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी या प्रकल्पातील माहिती उपयुक्त ठरणार आहे. रोजगार हमी योजना उपकर व शिक्षण कर यामुळे निश्चित करता येणार आहे. पीक कर्ज , पीक विमा योजना व कृषीगणना यामुळे अत्यंत सुलभ व अचूकरित्या पूर्ण करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त गमे यांनी दिली.

चांगला प्रतिसाद नाशिक विभागात धुळे जिल्ह्यात ई-पीक पाहणीचे कामकाज हे 67.04 टक्के इतके झालेले असून, जळगाव जिल्हयात ई-पीक पाहणी चे कामकाज हे 59.31 टक्के इतके झालेले आहे. नाशिक जिल्हयात दिंडोरी तालुक्यात ई-पीक पाहाणीचे कामकाज हे 94.52 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तसेच नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यात देखील ई-पीक पाहणी चे कामकाज हे 74.56 टक्के इतके झालेले आहे. जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यात ई-पीक पाहणी चे कामकाज हे 72.84 टक्के इतके झालेले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील ई-पीक पाहणीचे कामकाज हे 71.43 टक्के इतके झालेले आहे. विभागातील इतरही तालुक्यात शेतकऱ्यांकडून या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इतर बातम्याः

गुन्हेगारांची सुरस कथाः पठ्ठे ऐटबाज रहायचे, चारचाकीतून यायचे अन् मंगळसूत्र चोरायचे; गुजरातची टोळी नाशिकमध्ये चतुर्भुज

Wife’s murder: टीव्ही बघणाऱ्या बायकोचा डोक्यात मुसळ घालून खून; नाशिकमधल्या घटनेत आरोपीला जन्मठेप

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.