Special Report : वडिलांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारली, मुलानं अपक्ष अर्ज दाखल केला, सत्यजित तांबे भाजपाचे उमेदवार?

एक काँग्रेसकडून आणि एक अपक्ष असे दोन अर्ज सत्यजित तांबे यांनी दाखल केले. पण, काँग्रेसचा एबी फार्म नसल्यानं सत्यजित तांबे अपक्ष म्हणून मैदानात आहेत.

Special Report : वडिलांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारली, मुलानं अपक्ष अर्ज दाखल केला, सत्यजित तांबे भाजपाचे उमेदवार?
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 10:48 PM

नाशिक : महिनाभरापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्यावरून सूचक वक्तव्य केलं होतं. त्याचाच परिणाम नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात पाहायला मिळतो. काँग्रेसनं सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्याचे पुत्र सत्यजित तांबे यांनी मात्र अपक्ष अर्ज भरला. त्यामुळं सत्यजित तांबे भाजपाचे उमेदवार असल्याची चर्चा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्येचं खळबळ उडाली आहे. काँग्रेसनं उमेदवारी सुधीर तांबे  (Sudhir Tambe) यांना दिली होती.

सुधीर तांबे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. पण, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर सुधीर तांबे यांनी काँग्रेसमध्येच बाँब टाकला. स्वतः फार्म न भरता सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित तांबे यांचा अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सत्यजित तांबे यांनी दोन अर्ज दाखल केले.

सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार

एक काँग्रेसकडून आणि एक अपक्ष असे दोन अर्ज सत्यजित तांबे यांनी दाखल केले. पण, काँग्रेसचा एबी फार्म नसल्यानं सत्यजित तांबे अपक्ष म्हणून मैदानात आहेत. असं असलं तरी सत्यजित तांबे भाजपाचेच उमेदवार असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे.

सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठिंबा मागितला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी विनंती करणार असल्याचं सत्यजित तांबे फार्म भरल्यानंतर म्हणाले.

बावनकुळे म्हणतात, पाठिंबा मागितल्यास विचार करू

विधान परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांना मदत केली जाते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करू. भाजपानं कुणालाही एबी फार्म दिला नाही. त्यामुळं आता भाजपाची भूमिका ठरवावी लागेल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

भाजपमध्ये सत्यजित तांबे यावेत, यासाठी रस्सीखेच करण्यात आली. पण, सत्यजित तांबे हे भाजपामध्ये येऊ शकले नाही. भाजपानंही नाशिकमध्ये आपला अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. भाजपाच्या धनराज विसपुते यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय.  शुभांगी पाटील यांनीही अर्ज भरला. पण, या दोघांनाही भाजपानं एबी फार्म दिलाच नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.