Chhagan Bhujbal : जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनासह वसतीगृहे सुरू करावीत; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्हॅक्सिन ऑन व्हिल ही मोहिम राबविण्यात येत आहे. मालेगावमध्ये लसीकरण कमी असल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या काळात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal : जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनासह वसतीगृहे सुरू करावीत; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन
जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनासह वसतीगृहे सुरू करावीत; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 12:25 AM

नाशिक : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांसह सर्व प्रकारची वसहतीगृहे(Hostels) खुली करावीत. तसेच जिल्ह्यातील कमी होणारी ॲक्टिव्ह रूग्णांची टक्केवारी व रूग्णालयात दाखल रूग्णांची संख्याही आश्वासक आहे. शासनाकडून कायमच मोफत स्वरूपात लस मिळेल असे समजू नये, नागरिकांनी शासनामार्फत मोफत उपलब्ध असलेल्या लसीकरणाचा वेळीच लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड इतर अधिकारी व विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (Hostels should be started in the district along with rural tourism; Appeal of Chhagan Bhujbal)

लसीकरणाचा वेग वाढवण्यात यावा

रुग्णसंख्या 18 हजार 500 वरून 15 हजार 500 वर आलेली असून 3 हजाराने रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच पॉझिटिव्हीटी दर 41 टक्क्यांवरून 27 टक्क्यांवर आला आहे. सध्या म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही. त्याचप्रमाणे शाळा सुरू झालेल्या असून शाळांमध्ये अद्याप मुले बाधित झालेले नाहीत. हे चित्र अत्यंत आश्वासक आहे. यासोबतच मालेगावसह येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात लसीकरण वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्हॅक्सिन ऑन व्हिल ही मोहिम राबविण्यात येत आहे. मालेगावमध्ये लसीकरण कमी असल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या काळात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले.

पर्यटन स्थळावरील निर्बंध काढणार, मात्र नियम कायम

खुल्या पर्यटन स्थळावरील निर्बंध उठविण्यात येत असून मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे बंधने कायम राहतील. सशुल्क प्रवेशाची बंदिस्त पर्यटन स्थळे मात्र शासन अधिसूचना सुधारित होईपर्यंत बंदच राहतील. विद्यार्थ्यांची अडचण होत असून वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय आपत्ती नियंत्रण प्राधिकारणाकडून आजच घेण्यात आलेला आलेला आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर कार्यवाहक करण्याचेही आवाहन यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

मृत रूग्णांच्या वारसांची 8 हजार 900 प्रकरणे मंजूर

कोरोनामुळे मृत पावलेल्या रूग्णांच्या 13 हजार 520 वारसांनी सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 8 हजार 959 अर्जांची पडताळणी करून प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच उर्वरित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून सदर प्रकरणे शासनास सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. (Hostels should be started in the district along with rural tourism; Appeal of Chhagan Bhujbal)

इतर बातम्या

दिल्ली-जेएनपीटी हायवेमुळे दिल्ली ते मुंबई अंतर 12 तास, मुंबई, ठाणे, कल्याणमधील वाहतूक कोंडी कमी होणार-गडकरी

Dombivali : स्मशानभूमीचे काम एक महिन्यात झाले नाही तर प्रशानाची अंत्ययात्रा काढू, भाजपकडून केडीएमसी प्रशासनाला इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.