Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : खातं कुठलंही असो, काम कसं करतो हे महत्त्वाचं, गिरीश महाजन म्हणाले, चांगले उपक्रम राबविणार

40-42 मंत्री लवकरच कारभार हाती घेतील. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खात्यांचं वाटप केलं जाईल. विस्तार झाला. आता अडथळे दूर झाले आहेत. कामांना गती येईल, असंही त्यांनी सांगितलं.

Girish Mahajan : खातं कुठलंही असो, काम कसं करतो हे महत्त्वाचं, गिरीश महाजन म्हणाले, चांगले उपक्रम राबविणार
गिरीश महाजन म्हणाले, चांगले उपक्रम राबविणार
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 10:28 PM

नाशिक : खातेवाटप झाल्यानंतर प्रतिक्रिया सुरू झाल्या. कोण नाराज आहे, कुणाला कोणतं खात मिळालं, यावरून चर्चा आहेत. गिरीश महाजन खातेवाटपावर म्हणाले, खाते जे मिळाले ते समाधानी असण्यासारखेच. पक्ष जी जबाबदारी देईल ती पेललीच पाहिजे, खाते कुठलेही असो. आपण काम कसे करतो त्याला महत्त्व असते. जी जबाबदारी मुख्यमंत्री आणि फडणवीस आणि पक्ष देईल ती स्वीकारणार आहे. ग्रामविकास मिळालय. मी ग्रामीण भागातूनच निवडून येतो. बंजारा समाज, आदिवासी (Tribals), वंजारी यांच्याशी जवळचा संबंध आहे. वैद्यकीय शिक्षणही माझ्याकडे आहे. मागेही सर्वत्र चांगले उपक्रम आपण हाती घेतले होते. सर्वसामान्यांशी निगडित खाते असल्याने मला या खात्यात रस आहे. क्रीडा खाते आहे. मी स्वतः खेळाडू आहे. अनेक खेळ खेळलो आहे. ऑलराउंडर (All Rounder) होतो. युवक खेळाकडे वळला तर व्यसनापासून लांब राहील. क्रीडा विभागात बोगस सर्टिफिकेट (Bogus Certificate) आणि इतर प्रकार उघडकीस आले होते. त्याबाबत चौकशा सुरू आहेत. मी कार्यभार हाती घेतल्यावर यात लक्ष घालेन, असं आश्वासन त्यांनी दिलं.

पाहा व्हिडीओ

40-42 मंत्री लवकरच कारभार हाती घेतील

गिरीश महाजन म्हणाले, जी चर्चा आहे. त्याव्यतिरिक्त काहीतरी होणार आहे, अशी कल्पना फडणवीस यांनी आधीच दिली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चांगले खाते ठेवले, असे विरोधी पक्षाला काहीतरी बोलायचे म्हणून म्हणतायत. केवळ वीस मंत्र्यांवर सरकार चालेल, असे शक्य नाही. बाकी मंत्रिमंडळ विस्ताराला जास्त वेळ लागणार नाही. काही अडचणी नाहीत. सर्व तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. 40-42 मंत्री लवकरच कारभार हाती घेतील. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खात्यांचं वाटप केलं जाईल. विस्तार झाला. आता अडथळे दूर झाले आहेत. कामांना गती येईल, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

खेलो इंडियामुळं जबाबदारी वाढली

गिरीश महाजन यांनी सांगितलं की, खेलो इंडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाला महत्त्व दिलं आहे. ही जबाबदारी व्यवस्थित बजवावी लागणार आहे. युवक खेळाकडं वळला, तर तो निर्व्यसनी राहतो. मी स्वतः शालेय जीवनापासून खेळत आलो. कॉलेजमध्ये सात-आठ खेळ खेळत होतो. शारीरिक खेळ, मैदानी खेळ याकडं लक्ष दिलं पाहिजे. माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसते आहे का ? असे काहीही नाही. मी खुश आहे. पूर्ण वेळ देऊन काम करणार. जे मिळालं ते योग्य पद्धतीनं करण्याचा मानस आहे. झेंडा वंदन माझ्या हस्ते आहे. पण, पालकमंत्री अजून ठरलेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. खातेवाटपाबाबत कोणी मंत्री नाराज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.