…आता अवकाळी पावसानं सगळं पीकच मातीत घातलं; गहू, हरभरा, कांदा, मूग सगळं पीकच पाण्यात
इगतपुरी परिसरात सकाळ पासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी आठ वाजल्यानंतर आकाशात विजा चमकत होते.
इगतपुरीः राज्यातील शेतकरी सध्या प्रचंड संकटात सापडला आहे. एकीकडे पिकवलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे निसर्गाने रुद्रावतार दाखवत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे. इगतपुरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीकं सगळी पाण्यात गेली आहेत. त्यामुळे एकीकडे बाजारभावामुळं शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घासही निघून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.
त्यामुळेच आमदार छगन भुजबळ यांनीही अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
इगतपुरी तालुक्यात मध्यरात्री जोरदार सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह अवकाळी आणि त्याच बरोबर गारांच्या माऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जोरदार फटका बसला आहे.
रब्बी हंगामातील गहू,मूग, हरभऱ्यासह उन्हाळी कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा प्रकारे निसर्गामुळे एकीकडे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतात काढणी करुन पोळ लावून ठेवलेला हरभरा, काढणीसाठी आलेला गहू, मूग,कांदा पीक अवकाळी पावसात आणि गारांच्या माऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं मातीत गेली आहेत.
यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अजूनही शेतात पाणी साचले असून आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने निसर्गाने सगळी पीक हिरावून घेतली आहेत.यामुळं आता बळीराजा हवालदिल झाला आहे.
इगतपुरी परिसरात सकाळ पासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी आठ वाजल्यानंतर आकाशात विजा चमकत होते.
तर या मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार सोसाट्याचा वारा सुटला आणि अवकाळी पाऊस आणि गारांचा मारा सुरु झाला.
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे,नांदुरवैद्य, कुऱ्हेगाव,गोंदे दुमाला, मुंढेगाव परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.मात्र काढणीसाठी आलेल्या गहू,हरभरा,कांदा, मूग पिकांसह चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.