नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात

गोदातीरावर वसलेल्या रम्य अशा नाशिक (Nashik) नगरीमध्ये सध्या डेंग्यू (dengue) आणि चिकुन गुन्याने (chikungunya) थैमान घातले आहे. शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 700 च्या पुढे गेली आहे, तर चिकुन गुन्या रुग्णांची संख्या साडेपाचशेच्या घरात आहे. दोन्ही रुग्णांची संख्या जवळपास तेराशेंच्या घरात आहे.

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात
डेंग्यूचे रुग्ण वाढले.
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 2:18 PM

नाशिकः गोदातीरावर वसलेल्या रम्य अशा नाशिक (Nashik) नगरीमध्ये सध्या डेंग्यू (dengue) आणि चिकुन गुन्याने (chikungunya) थैमान घातले आहे. शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 700 च्या पुढे गेली आहे, तर चिकुन गुन्या रुग्णांची संख्या साडेपाचशेच्या घरात आहे. दोन्ही रुग्णांची संख्या जवळपास तेराशेंच्या घरात आहे.  (Increase in dengue and chikungunya patients in Nashik)

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी खरे तर सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, सप्टेंबर महिना पुन्हा एकदा आरोग्यासाठी घातक ठरत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा कहर होता. आता या वर्षी डेंग्यू आणि चिकुन गुन्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 14 तारखेपर्यंत शहरात डेंग्यूचे 140 नवे रुग्ण सापडले आहेत, तर चिकुन गुन्याचे 95 नवे रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यात 311 डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. तर चिकुन गुन्याचे 210 रुग्ण सापडले होते. नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. कधी भुरभुर पाऊस सुरू असतो. तर कधी सरीवर सरी बरसत असतात. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरली आहे. हे पाहता महापालिकेने पेस्ट कंट्रोलचे काम सुरू केले होते. मात्र, या कामाच्या कार्यक्षमतेबद्दल नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

पाच वर्षांतील रुग्ण

नाशिकमध्ये 2017 मध्ये डेंग्यूचे 151 रुग्ण होते, तर चिकुन गुन्याचे 4 रुग्ण होते. 2018 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 368 वर गेला होता, तर चिकुन गुन्याचे 40 रुग्ण सापडले होते. 2019 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 177 होते. या वर्षी चिकुन गुन्याच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. फक्त 1 रुग्ण सापडला होता. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 115 होती, तर चिकुन गुन्याच्या रुग्णांची संख्या 7 होती. मात्र, 2021 डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते. शहरात डेंग्यूचे रुग्ण 717 वर, तर चिकुन गुन्याचे रुग्ण 537 वर गेले आहेत.

रुग्णालये फुल्ल

सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालये हे डेंग्यू तसेच चिकुन गुन्याच्या रुग्णांनी भरली आहेत. बऱ्याच रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चाच सुरू आहे. मात्र, सध्या तरी नाशिककरांना डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीने हैराण केल्याचे दिसत आहे. महापालिकेने वॉर्डनिहाय फवारणी करावी, डासांच्या उत्पत्ती ठिकाणांवर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (Increase in dengue and chikungunya patients in Nashik)

इतर बातम्याः

ओ मेरे सोना रे सोना रे सोना…नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 46900 वर!

नाशिकमध्ये प्रवेशाच्या नावाखाली 125 विद्यार्थिनींना कॉलेजचा गंडा, वर्षही जाणार वाया

चर्चा तर होणारचः नाशिकमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी व्यवस्थापकाची यथासांग पूजा अन् आरती!

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.