नाशिकमध्ये वाढत्या रुग्णांची चिंता, लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भुजबळांच्या प्रशासनाला सूचना

नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या (corona) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हे पाहता परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शुक्रवारी (24 सप्टेंबर) दिल्या आहेत.

नाशिकमध्ये वाढत्या रुग्णांची चिंता, लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भुजबळांच्या प्रशासनाला सूचना
नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली.
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 3:45 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या (corona) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हे पाहता परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शुक्रवारी (24 सप्टेंबर) दिल्या आहेत. (Increase vaccination to control corona, instructions to Guardian Minister Bhujbal’s administration)

पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, सुहास कांदे, नितीन पवार, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात जोर द्या

यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यासाठी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिने लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे दिवसाला एक लाख लसीकरण होण्याच्या दृष्टिने लसींची मागणी करून त्यानुसार नियोजन करण्यात यावे. ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, त्याठिकाणी वीजेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर बसवावेत. जेथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तयार आहेत, त्या प्रकल्पांचे आमदारांनी उद्घाटन करून प्रकल्पांचे लोकार्पण करावे.

नियमांची कडक अंमलबजावणी

निफाड, येवला व सिन्नर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने ग्रामीण भागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

35 रुग्णवाहिका मंजूर

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. त्यादृष्टिने जिल्हा परिषदेला 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजातून 35 रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील अंतर लक्षात घेता तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका बदलून नव्या रुग्णवाहिका मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. तसेच कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचे प्रलंबित वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याअगोदर नियमाप्रमाणे पूर्व सूचना द्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांना वीज बिल अदा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. – छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक (Increase vaccination to control corona, instructions to Guardian Minister Bhujbal’s administration)

इतर बातम्याः

नाशिकच्या एंजलचा भीमपराक्रम; खवळलेल्या समुद्राशी झुंज देत 14 तास 23 मिनिटांत 45.1 किमीची इंग्लिश खाडी पार

महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये मारहाण

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.