नाशिक विभागातील 2 हजार 63 तलाठी कार्यालयांची होणार झाडाझडती

नाशिक विभागातल्या पाच जिल्ह्यातील एकूण 2063 तलाठी कार्यालयांची झाडाझडती होणार आहे. महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नाशिक विभागातील 2 हजार 63 तलाठी कार्यालयांची होणार झाडाझडती
राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 6:12 PM

नाशिकः नाशिक विभागातल्या पाच जिल्ह्यातील एकूण 2063 तलाठी कार्यालयांची झाडाझडती होणार आहे. या कार्यालयांच्या दप्तराची तपासणी येत्या तीन महिन्यांत करा, असे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्हयातील तलाठी दप्तरांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्वाचा कणा असून जमिनी विषयक सर्व प्रकारची कागदपत्रे सांभाळणारे व अद्ययावत करण्याची जबाबदारी असलेल्या तलाठी कार्यालयाशी सर्व सामान्य जनतेचा नेहमी संबंध येतो. तलाठी दप्तरामध्ये सामान्य शेतक-यांचे 7/12 उतारा, फेरफार यासह सरकारी जमीन इनाम व वतन जमीनी यांच्या नोंदी यासारखे अनेक अभिलेखे असतात. तलाठी दप्तराची वेळेवर तपासणी होऊन त्यामधील त्रुटींवर वेळेत कार्यवाही झाली तर गावपातळीवरील अनेक प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे वाद-विवाद व कनिष्ठ न्यायालयातील दावे कमी होतील, अशी आशा विभागीय आयुक्त गमे यांनी व्यक्त केली आहे.

तीन महिन्यांत कार्यवाही

नाशिक विभागातील पाच जिल्हयात एकूण 2063 तलाठी कार्यालये आहेत. नंदुरबार जिल्हयात 222, धुळे 225, जळगाव 501, नाशिक 532 तर अहमदनगर जिल्हयात 583 तलाठी आहेत. या सर्व तलाठी कार्यालयांच्या दप्तराची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून, पुढील तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.

होणार सखोल तपासणी

तलाठी दप्तरांची तपासणी करण्याचे सविस्तर आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. सखोल दप्तर तपासणी कशा पध्दतीने करावयाची याबाबत महसूल अधिका-यांची कार्यशाळाही नुकतीच घेण्यात आली. तलाठी दप्तर तपासणीमध्ये पीक पाहणी, 7/12 संगणकीकरण यासारख्या बाबींचीही छानणी केली जाईल. दप्तर तपासणीमध्ये विविध गाव नमुने, प्रलंबित फेरफार, सरकारी, वतन व इनाम जमिनींची नोंद यासह अनेक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.

जमिनीच्या तक्रारी सुटणार

नाशिक विभागातील पाचही जिल्हयातील सर्व प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्यासह जिल्हयातील इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तलाठी दप्तराची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये आढळणा-या त्रुटींची तातडीने पूर्तता करून सरकारी अभिलेखे अद्ययावत करण्याची कार्यवाही केली जाईल. तलाठी दप्तर तपासणीमुळे सामान्य शेतकरी व नागरिकांच्या जमीनी विषयक तक्रारी व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कुठल्याही सबळ कारणाशिवाय फेरफार आणि जमीन विषयक कामे प्रलंबित राहू नयेत, याकडे या तपासणीमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दप्तर तपासणीच्या कामासाठी एक ॲप तयार करण्यात येणार असून त्याव्दारे या कामाचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे.

इतर बातम्याः

आदिशक्तीचा जागर साधेपणाने; नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया नाही!

जरा विसावू या वळणावर; रोमँटिक कपल जेनेलिया-रितेशची नाशिकला भेट!

आरारारा खतरनाक; सोनं नॉनस्टॉप स्वस्त!

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.