Ketaki Chitale : कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? केतकी चितळेच्या पोस्टवरून सुप्रिया सुळेंनी फटकारलं

आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं त्यानंतर कोर्टानं तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र यावर अजूनही राष्ट्रवादीकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केतकी चितळेला फटकारलं आहे.

Ketaki Chitale : कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? केतकी चितळेच्या पोस्टवरून सुप्रिया सुळेंनी फटकारलं
केतकी चितळेची पोलीस कोठडी वाढवून मागणार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 3:52 PM

नाशिक : राज्यात हिंदूत्व हनुमान, चालीसा, नवनीत राणा (Navneet Rana), रवी राणा यांची अटक अशी प्रकरण गाजत असताना आता नव्या वादाला तोंड फुडलंय. कारण अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या पोस्टमध्ये पवारांबद्दल (Sharad Pawar) वादग्रस्त मजकूर टाकला. त्यानंतर शनिवारी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल व्हायची मालिका सुरू झाली. आणि बघता बघता केतली चितळेला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं त्यानंतर कोर्टानं तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र यावर अजूनही राष्ट्रवादीकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केतकी चितळेला फटकारलं आहे. कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? असा सवाल त्यांनी केतकी चितळेला केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

या पोस्टवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहलं आहे. जे काही झालं ते अत्यंत दुरुदैवी आहे. मी कितेकी चितळेला ओळखत नाही. मात्र मी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, आणि राज ठाकरेंचे आभार मानते, ही विकृती समाजासाठी अत्यंत वाईट आहे, ही वेळ कुणावरही येऊ शकते, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण गरजेचं आहे, अशाही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच मी ज्या मराठी संस्कृतीत वागले ते त्या संस्कृतीत हे बसत नाही, पवारांनी आजपर्यंत असा कुणाबद्दल शब्द नाही काढला, असे त्यानी आवर्जुन सांगितले.

महागाई सर्वात मोठी समस्या

तसेच त्यांनी इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. अनिल देशमुखांवर बोलताना त्या म्हणाल्या. अनेक वेळा रेड करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे. त्यांच्या हाती काही लागलं नाही, एवढ्या रेड होतात हे दुर्दैव आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. तसेच जनतेच्या पुढील महागाई हा सर्वात मोठा प्रश्न आहे असे म्हणत. सुषमा स्वराज यांचं उदाहरण देऊन सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला आहे. तर पंतप्रधानांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक राजकारण बाजुला ठेवून घ्यावी आणि महागाईवर आधी तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केलं. तसेच नाना पटोले यांच्या खंजीर खुपसला या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या नाना पटोलेंचं वक्तव्य म्हणजे घरात भांड्याला भांड लागतं. मात्र त्यांनं नात जास्त घट्ट होतं. ज्याच्याकडून अपेक्षा असते त्यांच्याकडून त्यांनी मागितलं पाहिजे, असे म त्यांनी व्यक्त केलं आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.