Yevla Election Results 2024: येवल्याचा गड कोण राखणार? छगन भुजबळांसमोर माणिकराव शिंदेंचं कडवं आव्हान

येवला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक छगन भुजबळांसाठी सोपी राहिलेली नाही. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) माणिकराव शिंदे यांंचं कडवं आव्हान आहे. या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Yevla Election Results 2024: येवल्याचा गड कोण राखणार? छगन भुजबळांसमोर माणिकराव शिंदेंचं कडवं आव्हान
छगन भुजबळ, माणिकराव शिंदेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 1:00 AM

विधानसभा निवडणुकीत राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांवर सर्वांची नजर आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभेचाही समावेश होते. महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ आहे. येवला विधानसभा मतदारसंघ हा भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. महायुतीत अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणार उतरवलं आहे. येवला विधानसभेचा गड कोण राखणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

गेल्या दोन दशकांपासून भुजबळ येवल्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. पण मराठा समाजातील अस्वस्थता, शेतकरी वर्गाची नाराजी, सलग दोन दशक प्रतिनिधित्व केल्याने जनतेच्या मनात निर्माण झालेली विरोधी भावना यांसारख्या कारणांमुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. मुंबईत पराभूत झाल्यानंतर छगन भुजबळ 2004 मध्ये येवल्यात आले. तेव्हापासून ते सलग चार वेळा विजयी झाले. विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रत्येक निवडणूक सहजपणे जिंकली. इतकंच काय तर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरण दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतरही 2019 मधील निवडणुकीत भुजबळ यांनी मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळवलं होतं. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या संघर्षात त्यांची प्रतिमा बदलली. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हे एकमेकांसमोर आले. त्यामुळे मराठा आरक्षणाचे विरोधक अशी त्यांची रंगवलेली प्रतिमा या निवडणुकीत त्रासदायक ठरतेय.

छगन भुजबळ यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना साथ दिल्याने दुखावलेल्या शरद पवारांनीही आपली पहिली जाहीर सभा येवल्यातच घेतली. मराठा समाजातील माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवत त्यांनी मत विभाजनावर भर दिला. सव्वा तीन लाख मतदार असणाऱ्या येवला मतदारसंघात एक लाख 30 हजारांहून अधिक मराठा तर 55 हजारहून अधिक ओबीसी मतदार असल्याचा अंदाज आहे. तर अनुसूचित जाती-जमाती घटकांचे 60 हजार, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 30 हजार, अल्पसंख्यांक समाजाचे 26 हजारहून अधिक मतदार असल्याचं सांगितलं जातंय.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.