महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: जामनेरच्या देवपिंप्रीत चाकू हल्ला, पिस्तूल रोखून धमकावलं

जामनेर तालुक्यातील देवपिंप्रीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलं असून चाकू हल्ला आणि पिस्तूल रोखण्यासारखे प्रकार घडले आहेत. (Jamner Devpimpri Knife Attack)

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: जामनेरच्या देवपिंप्रीत चाकू हल्ला, पिस्तूल रोखून धमकावलं
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:50 PM

जळगाव : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलं आहे. जामनेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून रात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे चाकू हल्ला झाला आहे. पिस्तूल रोखून धमकावण्यात आल्याचा प्रकार देखील घडला आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. (Maharashtra gram panchayat elections 2021 Jamner Devpimpri knife attack one person )

ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट

गुरूवारी मध्यरात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यात एका गटाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून मध्यरात्री वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले.

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विरूध्द तक्रार

देवपिंप्री गावातील एका गटातर्फे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकार्‍यांविरूध्द जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीतील माहितीनुसार यमुनाबाई सपकाळे या देवपिंप्री ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा भाऊ नितीन प्रकाश सोनवणे हा देवपिंप्री फाट्यावर एकटा बसून लोकांशी मोबाईलवरून संपर्क करत होता. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी सुरेश शिंदे, चंद्रशेखर शिंदे, पप्पू शिंदे, त्यांचे दोन शालक, अमृत शिंदे, नितीन पाटील यांचेसह समर्थकांना घेऊन फाट्यावर आले. त्या ठिकाणी निकम यांनी शाब्दिक वाद घातला तर समर्थकांनी चाकूहल्ला केला. तर एकाने पिस्तूल काढून धाक दाखवला. यात नितीन प्रकाश सोनवणे हा जखमी झाला आहे. त्याने याबाबत पोलीसात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

जळगाव जिल्ह्यात मतदानाला सुरुवात

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या 5 हजार 154 जागांसाठी आज (शुक्रवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हाभरात 5 हजार 154 जागांसाठी एकूण 13 हजार 847 उमेदवार रिंगणात आहेत.

संबंधित बातम्या

Gram Panchayat Elections | तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? कसं चेक करालं?

“ग्रामपंचायतीला दोन गट उभे राहतात; निवडून येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमचे” अजितदादांनी हशा पिकवला

(Maharashtra gram panchayat elections 2021 Jamner Devpimpri knife attack one person )

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.