Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिक दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार, राज्य सरकारकडून समितीची नेमणूक
Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Dr Zakir Hussain Hospital) टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये( Nashik Oxygen tanker leaked) भरताना गळती झाली होती.
नाशिक : नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Dr Zakir Hussain Hospital) टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये( Nashik Oxygen tanker leaked) भरताना गळती झाली होती. यामुळे रुग्णालयात पुरवठा सुरु असणाऱ्या ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन अभावी 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास 30 ते 35 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जातोय. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Nashik Oxygen tanker leaked while tankers were being filled at Dr Zakir Hussain Hospital in Nashik Live Updates Twenty Two Patient died numbers may be increased)
नेमकी घटना काय?
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरायचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये 25 जणांना जीव गमावावा लागला. Maharashtra Nashik Oxygen tanker leaked while tankers were being filled at Dr Zakir Hussain Hospital in Nashik Live Updates Twenty Two Patient died numbers may be increased
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिक दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार, राज्य सरकारकडून समितीची नेमणूक
नाशिक दुर्घटनेबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत आहेत. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याज गरज असल्याचे सांगितले आहे. ही दुर्घटना मनला वेदना देणारी आहे. ही दुर्घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. तशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आम्ही एक समिती नेमण्याचे आम्ही जाहीर करत आहोत. यामध्ये विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे अध्यक्ष असतील. ही समिती एकूण सात जणांची असेल. आपण घडलेल्या घटनेची चौकशी करुच.
मला येथील प्रशासनाने सांगितलं की येथे ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे काहीही दिसत नव्हतं. मात्र, सगळे जीवावर उदार होऊन घटनास्थळी गेले. येथे लॉक तोडून ऑक्सिजनची गळती बंद करण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर उरलेलं 75 ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आलं. त्यानंतर गॅसचा टँकची वेल्डींग करण्यात आली.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑक्सिजनचा दाब आणि त्याची उपबल्धतात मोजता येते. माझ्या मतानूसार ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत एक विशेष मेन्टेनन्स करणारा एक व्यक्ती नेमला पाहिजे. आम्ही नेमलेली समिती काय उपायोजना केल्या पाहिजेत ते आम्हाला सूचवेल. अशा घटना पुढे होऊ नये म्हणून एक एसओपी ही समिती सूचवेल.
मृतांच्या नातेवाईंकाना राज्य सरकारकडून 5 लाख तर नाशिक पालिकेकडून 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. लिक्वीड ऑक्सीजन टँकमध्ये अशा प्रकारच्या घटना होण्याची शक्यता असते. सध्या पुरवण्यात येणारा 90 टक्के ऑक्सिजन हा लिक्वीड ऑक्सिजन आहे.
हा प्रकार नेमका कसा घडला याची माहिती तज्ज्ञ कमिटी घेईलच. मी माझं मत सांगण चुकीचं होईल. आम्ही नेमणूक केलेली समिती नक्कीच एक स्टँडर्ड एसओपी देईल, असा मला विश्वास आहे. ही एक दुर्घटना आहे. याच्या आम्हाला मला खोलात जावं लागेल.
-
नाशिक दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आणखी तिघांचा मृत्यू, आकडा 25 वर
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आणखी तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. या तिघांच्या मृत्यूनंतर आता या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा 25 वर पोहोचला आहे.
-
-
राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, प्रवीण दरेकर नाशकात, दु्र्घटनेबाबत एकमेकांत चर्चा
नाशिक : नाशिक येथे पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पोहोचले आहेत. ते एकमेकाशी घडलेल्या घटनेबद्दल चर्चा करत आहेत.
-
सरकारला हात जोडून विनंती, आतातरी जागे व्हा- प्रविण दरेकर
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाशिकच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. “नाशिकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. हा सरकारच सपशेल फोलपणा आहे. आम्ही मागील अनेक दिवसांपासून सांगतोय की आरोग्य यंत्रणा सक्षम करतोय. ही संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. सरकारला हात जोडून विनंती आहे की त्यांनी आतातरी जागं व्हावं. नालासोपाऱ्यात 9 जण ऑक्सिजनअभावी गेले. ठाण्यात 26 लोकांना शिफ्ट करावं लागलं. बोरेवलीला 46 जणांना शिफ्ट करावं लागलं, असं दरेकर म्हणाले.
सरकारने ऑक्सिजनचा साठा युद्धपातळीवर उपलब्ध करुन द्यावा.ऑक्सिजनचा साठा स्पेशल विमानाने आणावा. रेमडेसिव्हीरच्या बाबतीत राजकीय अभिनिवेश बाळगता साठा उपलब्ध करुन द्यावा. असेसुद्दा प्रविण दरेकर म्हणाले.
-
आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं- राज ठाकरे
नाशिकच्या दुर्घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, असं राज ठाकरे म्हणाले
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.
— Raj Thackeray (@RajThackeray) April 21, 2021
-
-
बाळासाहेब थोरात मुंबईहून नाशिकला रवाना
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुंबईहून नाशिकला रवाना झाले आहेत. सायंकाळी 7 वाजता ते डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात जाणार आहेत. यावेळीत ते ऑक्सिजन गळती का झाली याची पाहणी करणार आहेत.
-
नाशिकमधील घटना अतिशय दुखद, मृतांच्या कुटुंबीयांना शक्य होईल तेवढी मदत द्यावी- राहुल गांधी
नाशिकमध्ये ऑक्सीजनअभावी तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी नाशिकची घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याचे म्हटल्यानतंर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीसुद्धा या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. नाशिकमधील घटना अत्यंत दुखद असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो. तसेच राज्य सरकारला मृतांच्या कुटुंबीयांना शक्य होईल तेवढी मदत द्यावी असे आवाहन करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
The news of patients’ death at Nashik’s Zakhir Hussain Hospital is extremely tragic.
My heartfelt condolences to the aggrieved families.
I appeal to State Govt and party workers to provide all possible assistance.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 21, 2021
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: आईला 2 दिवस वेटिंगवर ठेवलं, हे काय हॉटेल आहे का? रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. या दुर्घटनेत 22 जणांनी जीव गमावला. यामध्ये एका महिलेनं जीव गमावला हे कळताच तिच्या मुलीनं आक्रोश व्यक्त केला. ईला 2 दिवस वेटिंगवर ठेवलं, हे काय हॉटेल आहे का?, अशी संतप्त भावना तिनं व्यक्त केली.
-
नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी- नरेंद्र मोदी
नाशिक येथे ऑक्सीजनअभावी तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असून यामुळे मला अतिशय दु:ख झाले आहे. या क्षणी मी मृतांच्या कुटुंबीयांचं सात्वन करतो, असं त्यांनी म्हटलंय. ट्विटरद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीये.
The tragedy at a hospital in Nashik because of oxygen tank leakage is heart-wrenching. Anguished by the loss of lives due to it. Condolences to the bereaved families in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी: अजित पवार
Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, ऑक्सिजन गळतीनंतर तब्बल 22 जणांचा मृत्यू
Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, ऑक्सिजन गळतीनंतर तब्बल 22 जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू https://t.co/LGTONrNqhI#Nashik | #Oxygen | #Maharashtra pic.twitter.com/t4YJ2vRCzu
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2021
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात घडलेली ऑक्सिजन गळतीची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: धनंजय मुंडे
Nashik Oxygen Leak LIVE Updates नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात घडलेली ऑक्सिजन गळतीची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे. मृत नागरिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिकच्या घटनेनं व्यथित झालो, अमित शाह यांच्याकडून संवेदना व्यक्त
नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यानं झालेल्या दुर्घटनेची बातमी ऐकून व्यथित झालो. या घटनेत ज्यांनी नातेवाईक गमावले आहेत ही त्यांच्यासाठी कधीच न भरुन येणारी आहे. त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. इतर रुग्ण बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
नासिक के एक अस्पताल में ऑक्सिजन लीक होने से हुई दुर्घटना का समाचार सुन व्यथित हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। बाकी सभी मरीजों की कुशलता के लिए ईश्वर से प्रार्थना करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) April 21, 2021
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करणार: राजेश टोपे
नाशिकच्या दुर्घटनेत 11 महिला आणि 11 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद घटना आहे. स्थानिक आयुक्त यांच्याशी बोललो आहे. घटनास्थळी भेट देण्यासाठी जात आहे. ते कोविड सेंटर होते. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल,अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नाशिकच्या घटनेबद्दल शोक व्यक्त
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो.
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 21, 2021
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: खासदार भारती पवार झाकीर हुसेन रुग्णालयात पाहणी करण्यासाठी दाखल
दिंडोरीच्या खासदार भारती पवार झाकीर हुसेन रुग्णालयात पाहणी करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. मृतांची संख्या जाहीर झाली नाही पण ही घटना दुर्दैवी असल्याची भावना खासदार भारती पवार यांनी व्यक्त केली.
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: आदित्य ठाकरे
Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री @ChhaganCBhujbal जी आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 21, 2021
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: या प्रकरणाला जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई: महापौर
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाली. त्यानंतर रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 22 जणांचा मृत्यू झाला. याला जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली आहे.
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: पालकमंत्री छगन भुजबळ झाकीर हुसेन रुग्णालयात पोहोचले
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ झाकीर हुसेन रुग्णालयात पोहोचले आहेत. छगन भुजबळ रुग्णालयात नातेवाईकांकडून माहिती घेत आहेत.
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: घटनेची सखोल चौकशी करावी: देवेंद्र फडणवीस
What happened in Nashik is terrible. It’s being said that 11 people died which is very disturbing. I demand that the other patients be helped & shifted if needed. We demand a detailed inquiry: Former Maharashtra CM and BJP leader Devendra Fadnavis on Nashik Oxygen tanker gas leak pic.twitter.com/GdLXzgGPwh
— ANI (@ANI) April 21, 2021
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: ठाकरे सरकारवर कारवाई करा, किरीट सोमय्यांची मागणी
ठाकरे सरकारच्या विरोधात कारवाई करा:
12 COVID Patients DIED at Nashik Hospital due to Defect in OXYGEN Supply During My Nashik Visit of 22 March, I had warned, Municipal Comisioner & Civil Surgeon. I demand action for Criminal Negligence against Thackeray Sarkar, Officials. It’s COVID Hatya by The System @BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 21, 2021
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र, यात मानवी चूक असेल तर चौकशी करून कारवाई करा: सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर: नाशिक मधील प्राणवायू गळती आणि बाधितांच्या मृत्यूवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक, आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र, यात मानवी चूक असेल तर चौकशी करून कारवाई करा, प्रशासन अधिक सुधारण्याची गरज आहे, जो प्राण वाचविणारा घटक आहे त्याचीच गळती म्हणजे गंभीर स्थिती आहे, राज्यात अन्यत्र अशा घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे, प्रशासनाला तांत्रिक चुका टाळण्यासाठी स्पष्ट सूचना देणे गरजेचे
-
Nashik Oxygen Leak LIVE Updates: अन्य रुग्णांना तात्काळ मदत केली पाहिजे, मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी: देवेंद्र फडणवीस
अन्य रुग्णांना तात्काळ मदत केली पाहिजे. सखोल चौकशी तर होत राहील. अन्यत्र अशी घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published On - Apr 21,2021 8:21 PM