युवकाचे अपहरण, ५० लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपींच्या अशा आवळल्या मुसक्या

50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यासाठी पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचला. अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली.

युवकाचे अपहरण, ५० लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपींच्या अशा आवळल्या मुसक्या
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 9:38 PM

मालेगाव : नाशिकच्या मालेगावमध्ये एका घटनेने खळबळ उडाली. एका अठरा वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यासाठी पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचला. अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. आणखी एक जण अद्याप फरार झाला आहे. या घटनेमुळे खंडणीखोरांवर चांगलीच चाप बसली. पण, हे खंडणीखोर अशी हिंमत कशी करतात, असा प्रश्न निर्माण होत आहे.

कुटुंबीयांनी घेतली पोलिसांत धाव

सुबोध कापडे असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुबोधचे सोयगावच्या डी. के. चौकातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्याच मोबाईलवरूनच त्याच्या पालकांकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहर हादरले होते. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

एका आरोपीला अटक, एक फरार

मालेगाव पोलिसांनी तात्काळ तीन पथके तयार केली. तपास यंत्रणचक्र फिरवली. अपहरणकर्त्याला जुना आग्रा रोडवरील एका हॉटेलवर खंडणी घेण्यासाठी बोलवले होते. आधीच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी संशयिताला अटक केली, तर एक आरोपी फरार झाला.

कोयता, गावठी पिस्टल आणि काडतुसे जप्त

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून अपहरणासाठी वापरण्यात आलेला कोयता, गावठी पिस्टल आणि 6 जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. अशी माहिती मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली.

18 वर्षीय युवकाचे अपहरण करण्यात आले. त्यासाठी आरोपींनी कोयता, गावठी पिस्टल आणि काडतुसे वापरली. युवकाचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी युवकाच्या वडिलांना फोन केला. यामुळे युवकाचे वडील हादरले. तरीही त्यांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.